मढी येथील चैतन्य कानिफनाथ यात्रेस प्रारंभ !

 

पाथर्डी - श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानीफनाथांची यात्रेस आज पासुन सोमवार (ता.६) रोजी सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. सकाळी ९ वा. कैकाडी समाज्याची मानाची काठी मंदीराच्या कळसाला भेटवून तर सायंकाळी गोपाळ समाजाची होळी पेटवल्या नंतर मढी यात्रेस प्रांरभ होनार आहे. गोपाळ समाजाचा दोन गटाचा वाद लक्षात घेता होळी पेटेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

मढी यात्रा ६ मार्च रोजी प्रारंभ होऊन रवीवार १२ रोजी रंगपंचमी यात्रेचा मुख्य दिवस आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा भरते. दोन वर्ष कोरोनामहामारीमुळे यात्रा भरली नाही. मागील वर्षी कोरोनचे निर्बंध घातल्याने यात्रा कमी प्रमाणात भरली होती. यंदा मात्र मढी यात्रा जोमाने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय असण्याची शक्यता असून परिणामी भाविकांना सोय व्हावी यासाठी प्रशासनाकडून ठोस नियोजन करणे अपेक्षित आहे. पोलीस प्रशासन वगळता इतर विभागाकडून यात्रेची कुठलीही दखल आतापर्यंत घेण्यात आलेली नाही.

पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी बैठक झाल्यानंतर वेळोवेळी पाहणी करून पोलीस विभागाकडून वाहनतळ रस्ते व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रे निमीत्त पुणे, नगर, पाथर्डी, कंरजी,तिसगाव, शेवगाव, सोलापुर,पंढरपुर, औरंगाबाद येथुन विवीध हॉटेल व्यावसायीक दाखल झाले आहेत. रहाटपाळणे, मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहु महाराज आदिंनी येथे श्रध्दा व्यक्त करत संपुर्ण गडाचा विकास केला. राजघराण्याने विकास केला म्हणुन आजही संपुर्ण गड एखाद्या किल्ला सारखा दिसतो गड बांधणीसाठी विविध जाती धर्माच्या भावीकांचे योगदान लाभल्याने छत्रपतींना अशा सर्व भटक्या समाजाला यात्रेत विविध रूपात मानपान दिले आहेत .

गुजरात, आंध्रप्रदेश ,तमीळनाडु यासह विविध राज्यातुन मोठ्या संख्येने भावीक येथे येतात. १५ दिवस चालणाऱ्या यात्रेची सर्व तयारी देवस्थान समीती व ग्रामपंचायतीकडुन सुरू आहे .भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारीत बॅरीकेटींग व मजबूत रेलिंग अशी कामे युध्द पातळीवर सुरू आहेत. मुख्य कानीफनाथ मंदीर व परीसरात सुशोभिकरण, दर्शन बारी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहनतळ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामाने वेग घेतला असुन मंदिर व मंदिर परिसर व आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे .

मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड,सचिव विमलताई मरकड ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच संजय मरकड उपसरपंच रवीद्र अरोळे , ग्रामसेवक विठ्ठल राजळे , ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समिती सर्व विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य , यासह सर्वच कर्मचारी विश्वस्त व परीश्रम घेत आहेत.देवस्थान समितीने १८ते २१ मार्च दरम्यान गुढी पाडव्यापुर्वी चार दिवस अगोदर कानिफनाथांचे समाधीमंदिर दर्शनाला खुले ठेऊन समाधी मंदिररात भावीकांना थेट प्रवेश मिळणार आहे.

नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत . जे खड्डे बुजवले ते चक्क मातीने बुजवल्याने माती टाकलेले खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने तत्काळ हे काम थांबवून डांबर-खडीने पॅचवर्कचे काम करावे, अशी मागणी होत आहे. तिसगाव मढी नवीन झालेल्या दिड किमी रस्ताच्या साईट पट्ट्या पूर्णपणे भरल्या नाहीत .रस्ता उंचीवर व साइट पट्ट्या खाली गेल्याने अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे .यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता मढी ते तिसगाव व निवडूंगे ते मढी या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने यात्रा काळात भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.


Post a Comment

0 Comments