करंजी - वंचित लोकांसाठी आपण कायम प्रयत्न करणार असून
त्यांच्यासाठीच राजकारण न करता समाजातील तळागाळातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आपण
यापुढे समाजकारण करणार असल्याचे प्रतिपादन सुधाकर आव्हाड यांनी यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे बारामतीचे उमेदवार नवनाथ पडळकर, जालन्याचे संजय भोसले, शिरूरचे राहुल ओव्हळ, बजरंग क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश राठोड यांसह अनेक वंचितच्या
नेत्यांनी भाजप पक्षात मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर
बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याचेही सुधाकरराव आव्हाड यांनी सांगितले.
सुधाकर आव्हाड म्हणाले की, यापुढे आपण आता फक्त
समाजाच्या हिताची कामे करणार आहोत राजकारण कमी करून समाजकारण ज्यादा करणार आहोत
तसेच वंचितमध्ये जो अजेंडा होता तोच अजिंठा यापुढेही भाजपामध्ये राबवणार आहोत.
कोणत्याही जाती धर्माचे असले तरीही त्यांना समाजामध्ये स्थान देऊन त्यांच्या
प्रगतीसाठी प्रयत्न करणार आहे.भटक्याची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी ता. पाथर्डी
येथील श्री नवनाथांच्या पावन भूमीमध्ये भटक्यांना मोठे महत्त्वाचे स्थान आहे.
वर्षानुवर्षे भटकत राहणाऱ्या या समाजाचे लोक फक्त एकच दिवस भेटण्यासाठी येतात व
नंतर पुन्हा भटकंतीसाठी जातात मात्र ते वर्षभर कोठे असतात व काय करतात.
त्यांचा एकमेकांशी संपर्क येत नाही तसेच ते भटकत असल्यामुळे त्यांचे
मुलांना शिक्षणही भेटत नाही त्यांच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाचा जोड मिळत
नाही आणि म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत आपण चर्चा केली
आहे. हा विषय खुप महत्वाचा आहे असे म्हणत मढी येथे भटक्यांचे विद्यापीठ व्हावे
म्हणुन फडणवीस हेही सकारात्मक आहेत. येथे भटक्यांचे विद्यापीठ स्थापन झाल्यास मढी
परिसरातील गावांचा तसेच मढीचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. भटक्या घटकातील
सुमारे ४५ जाती जमातींच्या लोकांचा कायमस्वरूपीचा प्रश्न सुटेल.त्यामुळे आपण या
विद्यापीठाची तयारी करत असल्याचे आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
0 Comments