तिसगाव आरोग्य उपकेंद्राला आग !

 

पाथर्डी - तालुक्यातील तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील इमारतीला शनिवारी पहाटे अचानक आग लागल्याने या आगीमध्ये पीपीई किट सारखे कालबाह्य झालेले कोरोनाचे साहित्य जळून खाक झाले आहे.  

सकाळी सव्वासात वाजता अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर ही आग विझवण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन कर्मचारी उपस्थित असताना देखील त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही अशा ग्रामस्थांच्या तक्रारी असून ही आग लागली का लावली हा देखील तिसगावमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरील आग ही जुन्या इमारतीला लागली असून त्या इमारतीमध्ये जुने कालबाह्य आरोग्य साहित्य किरकोळ स्वरूपात जळाली असून आग विझवणात आली असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी याच उपकेंद्रातून चोरी तसेच आगीच्या अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्याने या घटनेच्या अनुषंगाने तिसगाव परिसरात चर्चेला उधाण आला आहे.


Post a Comment

0 Comments