करंजी घाटात पुर्ण जळालेल्या अवस्थेतील मृतदेह-डोक्याची कवटी व मोजकी हाडेच शिल्लक ! मृतदेह सापडण्याची मालिका थांबेना

करंजी - घाट सुरु होताच घाटाच्या दुसर्‍या वळणाच्या पारपिटाला लागुन पुर्ण जळालेल्या स्थितीत माणसाचा मृतदेह आढळून आला. यापूर्वीही असे अनेक मृतदेह करंजीच्या घाटात आढळुन आले आहेत त्यामुळे प्रेताची विल्हेवाट लावण्याची जागा अशी ओळखच जणु घाटाची होवु पहात आहे. 

नगर-पाथर्डी महामार्गावर करंजीचा अवघड घाट लागतो, घाट सुरु झाल्यानंतर दुसर्‍याच वळणाच्या पारपिटाच्या आडोशाला एका अज्ञात इसमाच्या शरिराचे पुर्ण जळालेल्या अवस्थेत काही अवशेष आढळुन आले. डोक्याची कवटी तसेच शरिराचे काही हाडे तेवढी शिल्लक होती. अतिशय मोजकेच अवशेष राहिल्याने हा मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याचा अंदाज लावणे देखील कठीण झाले आहे. 
मृतदेह पुर्ण जाळुन टाकल्याने आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या मृतदेहाच्या कवटीवरून व अवयवांवर हा मृतदेह महिला किंवा तरुणीचा असावा असा अंदाज येणारे-जाणारे प्रवाशी लावीत होते. या घाटाच्यावर हनुमान मंदिरानजिक मराठवाड्याची हद्द लागते, तर दुसऱ्या बाजुने नगर तालुक्याची हद्द सुरु होते. या हद्दीचा फायदा गुन्हेगार घेतात. गेल्या काही दिवसापासुन या घाटात मृतदेह सापडण्याची जणु मालिकाच सुरु झाली आहे. घाटात आढळुन आलेल्या या माणसाच्या अवयवांचा पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments