पाथर्डी – तालुक्याच्या सरहद्दीवरील एका गावात मंगळवारी धुलीवंदनाच्या
दिवशी दुपारी एक वाजता मागासवर्गीय अल्पवयीन बालिकेवर गावातीलच आरोपीने मित्राच्या
मदतीने घराचा दरवाजा बंद करून बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली असून पोलिसात
अनुसूचित जातीजमाती छळ प्रतिबंधक कायदा तसेच बाल लैंगिक छळ विरोधी कायद्यान्वये
दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
देशभरात मंगळवारी
धुलिवंदनाचा सन तसेच बुधवारी महिला दिनाच्या शुभेच्छाची देवाण घेवाण सुरु असतांना
पाथर्डी तालुक्यातील एका गावात उसतोड मजुराच्या अल्पवयीन बालिकेवर गावातील आरोपी
सुनील अशोक होडशीळ याने त्याचा आरोपी मित्र पप्पू मारुती केकाण या मित्राच्या मदतीने पाळत
ठेवून, पिडीत बालिका मैत्रिणी सोबत गावातील दुकानात रंग आणायला गेली असता तिला
एकटीला गाठून आरोपी सुनील होडशील याने त्याच्या घरात उचलून नेहले त्यावेळी
पिडीतेची मैत्रीण घाबरून पळून गेली. दुसरा आरोपी पप्पू केकाण याने घराचा दरवाजा
बाहेरून लावून घेतला व आरोपी सुनील होड्शील याने पिडीतेवर अमानुष पद्धतीने
बलात्कार केला,घाबरून पिडीतेने आरडाओरडा केल्याने आजबाजूचे लोक व पिडीतेची आजी
घटना ठिकाणी आल्याने आरोपी पळून गेले,घटनेची माहिती उसतोडणी साठी दुसऱ्या
जिल्ह्यातील साखर कारखान्याला गेलेल्या पिडीतेच्या वडिलांना समजल्या नंतर ते बुधवारी गावी परतल्याने त्यांनी पाथर्डी पोलिसात पिडीतेचे पिता आरोपी सुनील अशोक होडशीळ व पप्पू मारुती
केकाण यांचे विरुद्ध अनुसूचित जातीजमाती छळ प्रतिबंधक कायदा तसेच बाल लैंगिक छळ
विरोधी कायद्यान्वये दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दोनही आरोपी फरार झाले
आहेत.
0 Comments