पाथर्डी - बाबूजी आव्हाड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी मा.आमदार स्व.ना.ग. उर्फ बाबुजी आव्हाड यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त पार्थ विद्या प्रसारक मंडळ आयोजित विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा २०२३ (वर्ष तिसरे) या स्पर्धा परीक्षेतील तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, की सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या युगात शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यातून विद्यार्थ्यांना विविध अनुभव मिळतात या अनुभवाच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्चपदापर्यंत पोहोचतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेलेली आहेत. विद्यार्थ्यांनी सतत कष्ट करण्याची सवय ठेवावी. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्वतःचे व आई वडिलांचे जीवन उज्वल बनवा. प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे यावेळी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षेत शहरी विभागातून प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, रोख पारितोषिक ,प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. तसेच ग्रामीण विभागातून प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह, रोख पारितोषिक,प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक यांना अल्पोपहार देण्यात आला.
विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली या स्पर्धा परीक्षेसाठी तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावी यावेळी अनेक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आपल्या भाषणातून परीक्षेच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड ,उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड , माध्य.मुख्याध्यापक शरद मेढे , स्वामी समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले, अश्पाक सय्यद,सुमन पालवे,अनुराधा फुंदे, दीपक बांगर, बाळकृष्ण भंडारी, गोटीराम शेळके,परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर गायके, अनुजा कुलकर्णी व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायके, सूत्रसंचालन आशा बांदल तर आभार अनुजा कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयश्री एकशिंगे, मनिषा गायके, ज्योती हम्पे,राधिका सरोदे, जयश्री खोर्दे,कीर्ती दगडखैर, दिपक राठोड, रावसाहेब मोरकर, दादासाहेब उदमले, ऋषिकेश मुळे, आजिनाथ शिरसाठ,बाळू हंडाळ व कैलास भोसले यांनी परिश्रम घेतले.
0 Comments