वामनभाऊनगरातील रोडरोमियोच्या बंदोबस्तांची मागणी

 

पाथर्डी – शहरातील वामनभाऊनगर येथील नागरिकांनी रोडरोमियो विरुद्ध मोर्चा उघडला असून  सकाळी व सायंकाळी रस्त्याने मंदिर तसेच व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्या महिला व मुलींची चेडछाड करणाऱ्या रोडरोमियोवर कडक कारवाई होण्याच्या मागणीसाठी येथील रहिवाश्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे.

वामनभाऊनगर मधील स्वामी समर्थ मंदिर परिसरात दैनदिन सकाळी व सायंकाळी शहरातील महिला तसेच मुलींची गर्दी असते,याचा गैरफायदा घेवून काही आंबशौकीन याठिकाणी गर्दी विनाकारण करतात,महिला रस्त्याने चालताना त्यांना विना क्रमांकाच्या दुचाकीवर येवून कट मारणे,जोरात हॉर्न वाजवणे,रस्त्याच्या कडेला बसून मोबाईलवर अश्लील गाणे लावून महिला मुलींची छेड काढली जाते,रोडरोमियोच्या उच्छादा मुळे स्वामीसमर्थ मंदिर परिसराचे पावित्र्य भंग होत आहे,याच परिसरातून शेवगाव रोडवर सकाळी व सायंकाळी व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिकांना अडवून सोनसाखळी लुटल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. वामनभाऊनगरातील अंधार असलेल्या आडोश्याच्या ठिकाणी दारुडे घोळका करून बसतात रस्त्यावर बाटल्या फोडतात याशिवाय याच परिसरातील स्वामीसमर्थ मंदिर,मंगल कार्यालये,वाचनालये,वाशिंगसेंटर तसेच पाणीपुरी,आईसक्रिमचे हातगाडे याठिकाणी रात्री रस्त्यावरच वाहनांची अस्थाव्यस्त पार्किंग करून टारगट युवक तसेच युगले खुलेआम चाळे करत असतात यामुळे परिसराचे सांस्कृतिक वातावरण दुषित बनू लागले आहे.

स्थानिक नागरिकांनी गैरप्रकारास विरोध केला असता वादावादी होते त्यामुळे या सर्व गैरप्रकाराला आळा घालण्यात येवून सायंकाळी पोलीस गस्त घालण्यात यावी या मागणीसाठी वामनभाऊनगरातील नागरिक रामनाथ चौधर,आजिनाथ पाखरे, अॅड.हरिहर गर्जे,सुभाष भागवत,प्रकाश बोरुडे,रोहित पुंड,सचिन नागापुरे,आशितोष शर्मा,सचिन झेंड,भागवत पालवे,योगेश डुकरे,ज्ञानेश्वर जायभाय,विवेक देशमुख,दीपक बाफना,सुभाष भागवत,कार्तिक कराड आदीसह नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांना निवेदन दिले.परिसरात साध्या वेशातील पोलिसी गस्त वाढवण्यात येवून रोडरोमियोना योग्य धडा शिकवला जाईल असे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी नागरिकांना दिले.  

 

Post a Comment

0 Comments