पाथर्डी - तालुक्यातील पागोरी
पिंपळगांव येथील सामाजीक कार्यकर्ते तथा राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे अहमदनगर
जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना बहुभाषीक भाऊ बाबा वंजारी संघ
महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्थरीय समाजभूषन समाजसेवक पुरस्कार देण्यात आला.
जय भगवान महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब
सानप व जेष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे व बदुभाषीक भाऊ बाबा वंजारी संघ महाराष्ट्राच्या
अध्यक्षा लक्ष्मीताई गर्कळ यांच्या हस्ते सन्मानपुर्वक मोठया दिमाखदार सोहळ्यामध्ये प्रधान
करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणुन अहमदनगर जिल्हा परीषदच्या माजी महिला
बालकल्याण सभापती हर्षदा काकडे व पाथर्डी पंचायत समीतीच्या सभापती सुनीता दौंड उपस्थित होत्या.
शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी हा पुरस्कार माझ्या शेतकरी
बांधवांच्या आशिर्वादाने मिळाला आसुन शेतकरी बांधवांसाठी आणखीन मोठी चळवळ उभी
करण्यासाठी हा पुरस्कार मला सदैव पाठबळ व प्रेरणा देत राहील असे मत पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त
केले तसेच त्यांनी सदरचा पुरस्कार कष्टकरी शेतकरी बांधवास समर्पित केला यावेळी
पुरस्कार घेण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील शेतकरी प्रतीनिधी रंगनाथ बोके, सुरेश लांडगे,हारी वायकर, मल्हारी कुटे व आदर्श
शिक्षक लक्ष्मण गर्जे उपस्थित होते. शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना
राज्यस्थरीय समाजभूषन
समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर मधील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त
केले आसुन शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल खास करून
शेतकरी बांधवांकडून व समाजातील सर्व स्थरामधून अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments