वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांचा मोर्चा

अहमदनगर - दिल्ली जंतर मंतर येथे सर्व जीसीओ व जवान हे आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करत असून, त्यांना अहमदनगर जिल्ह्यातील सर्व त्रिदल माजी सैनिक संघटनातर्फे जाहीर पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर मुख्यालयाचे त्रिदलचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे, आरोग्य सेलचे अध्यक्ष युनूस टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी मोर्चा काढण्यात आला होता.  

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, मुख्यालय त्रिदल माजी सैनिक सेवा संघाच्या नगर शाखेचे बाळासाहेब आंधळे, युनूस टेंगे, शहराध्यक्ष प्रकाश परकाळे, सचिव सतीश घुमरे, खजिनदार रामदास पालवे, संचालक शांतीलाल पवार, पाथर्डी तालुकाध्यक्ष गोवर्धन गर्जे, जामखेडचे अध्यक्ष लक्ष्मण भोरे,सचिव शहाजी ढेपे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, अण्णासाहेब सांगळे, रवींद्र रासकर धर्मनाथ पालवे,उपाध्यक्ष हरिभाऊ चिरके, संचालक पांडुरंग बनकर, चोरमले, अशोक राजळे, रवींद्र रासकर आदी उपस्थित होते. 

यावेळी पाथर्डी तालुका त्रिदल अध्यक्ष गोवर्धन विक्रम गर्जे,रोहिदास एडके, म्हातारदेव आव्हाड,अश्रूबा घुगे,प्रभाकर फुंदे,विठ्ठल तांदळे, भीमराज पाटेकर,शिवनाथ ढोले,ज्ञानदेव शिकारे,सुधाकर आव्हाड,अशोक गोरे,चांगदेव आठरे,गायकवाड,भानुदास केदार,दिगांबर फुंदे,सुखदेव तुपेरे,महादेव आंधळे,अण्णा घुले,अशोक शिरसाठ,किशोर शिरसाठ,रमेश कराळे,बबन शिरसाठ,बाळासाहेब फाजगे,रमेश ढाकणे,अनिल शिरसाठ,बाळासाहेब वांढेकर,सुदाम खेडकर,सोपान मंचरे,संतोष शिदोरे,अशोक गोरे, काकासाहेब काजळे,रमेश भाबड, नारायणर घुले,प्रभाकर फुंदे,अश्रूबा गर्जे,दिलीप आव्हाड,लक्ष्मन बडे,वासुदेव शिरसाठ, बाबासाहेब शिरसाठ, डमाळे,अन्वर पठाण,रामराव दराडे,विठ्ठल पालवे,अशोक गायकवाड,ज्ञानदेव कुल्हारि,चंद्रकांत कवले,जगताप,  दारकुंडे ,सादिक शेख,इत्यादी पाथर्डी तालुक्यातील माजी सैनिक उपस्थितीत होते.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आंधळे म्हणाले, सर्व माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन योग्य दराने दिली पाहिजे. अधिकारी वर्गाच्या आणि आमच्या पेन्शनमध्ये खूप तफावत आहे. ती दूर केली पाहिजे आणि मिलिटरी सर्विस पे (पगार ) सर्व रँकचा एकच असला पाहिजे. तसेच अपंगत्व पेन्शन अधिकारी आणि जवान व जेसीओ (ज्युनिअर कमिश ऑफिसर) यांना समान पेन्शन मिळाली पाहिजे. त्यात खूप त्रुटी व तफावत आहे. त्या त्रुटी दूर कराव्यात. तसेच डीसीबीलटी पेन्शनमध्ये अधिकारी व जवान यांच्यामध्ये जी खुप तफावत आहे, ती देखील दूर करावी. केंद्र सरकारने देशातील सर्व माजी सैनिकांच्या बाबतच्या सर्व त्रुटी दूर करून मागण्या मान्य कराव्यात. या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत तर सहकुटुंब सहपरिवार माजी सैनिकांच्या वतीने देशात मोठे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

Post a Comment

0 Comments