साहेब दारू विक्रेत्यावर कारवाई करा अन्यथा झोडपून काढू !


पाथर्डी - आगसखांड येथे अवैध दारु विक्री किराणा दुकानातुन होते,पाचवीत शिकणारे मुले दारु पितात,दिवसभर कष्ट करणा-या महीलेला सायंकाळी घरी आल्यावर दारु पिलेला नवरा मारझोड करतो,साहेब आता सहन होत नाही,तुम्हीच काही तरी करा,अन्यथा कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर दारु विक्रेता व दारु पिणारा झोडपुन काढु अशा इशारा आगसखांड गावातील महीलांनी दिला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांची भेट घेवुन महीलांनी कारवाईची मागणी केली.आगसखांड गाव हे धार्मिक पार्श्वभुमी असलेले गाव आहे. अलीकडच्या काळात गावात काही किराणा दुकानदार व टपरीधारक अवैध दारु विक्री करीत आहेत.त्यामुळे अगदी शाळेतील बारा वर्षाची मुले देखील दारु पित आहेत. गावातील कुटुंब चालविणारे माणस दारुच्या व्यसनी गेल्याने अनेक कुटुंब उधवस्त झाली आहेत. महीलांना काबाड कष्ट करुन घरी आल्यानंतर व्यसनी नव-या पासुन त्रास सहन करावा लागत आहे. आगसखांड गावातील अवैध दारु विक्री करणा-या किराणा दुकानदार व टपरी धारकांवर कारवाई व्हावी अवैध दारु विक्री बंद करावी.

वैशाली भाबड,अंजना भाबड,सरस्वती कदम, छाया सानप,सुमन भाबड,सिंधुबाई खाडे, सुंदरबाई बडे,सुरेखा कदम, इंदुबाई रंधवे, नंदुबाई शिरसाटआशा खआडे, नानुबाई भाबड,पांडुरंग लाड, संदीप गिते, पांडुरंग भाबड, प्रविण घुले, नामदेव खाडे, दिपक भाबड, विलास आव्हाड यांच्यासह महीलांना सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांची भेट घेवुन कारवाईची मागणी केली. यावेळी आम्ही संबधितावर कारवाई करु. मात्र तुम्ही दारुबंदी खात्याकडे तक्रार करावी असे कायंदे यांनी सागितले.

Post a Comment

0 Comments