पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील राजकिय अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या निंबोडी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जय हनुमान पॅनल व सेनेचे राजेंद्र म्हस्के व मंगलताई म्हस्के यांच्या आदिनाथ शेतकरी ग्रामविकास पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. या सोसायटीच्या चुरशीच्या निवडणुकीत राजेंद्र म्हस्के यांच्या आदिनाथ शेतकरी पॅनलने ११ पैकी ९ जागा मिळवुन निर्विवाद वर्चस्व मिळवीत सोसायटीची सत्ता आपल्या हातात घेतली. जय हनुमान मंडळाला अवघ्या दोनच जागेवर समाधान मानावे लागले. राजेंद्र म्हस्के पाटील हे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे कट्टर समर्थक म्हणुन ओळखले जातात. या सोसायटीत विजय मिळविल्याबद्दल आमदार तनपुरे, प्रतापराव ढाकणे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी आदिंनी राजेंद्र म्हस्के व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
या चुरशीच्या निवडणुकीत आदिनाथ पॅनलचे खालील उमेदवार विजयी झाले, म्हस्के राजेंद्र एकनाथ, म्हस्के अशोक चंद्रभान, म्हस्के गोरख रामभाऊ, म्हस्के गोरख रंगनाथ, म्हस्के दादासाहेब भगवान, भापसे जिजाबाई अण्णासाहेब, भापसे संगीता रोहिदास, म्हस्के मनिषा लक्ष्मण, ससाणे मिराबाई भाऊसाहेब.
या निवडणुकीत प्रसाद शुगरचे मुख्य अभियंता संजय म्हस्के, विजय म्हस्के, रोहिदास भापसे, पप्पु म्हस्के, अंबादास म्हस्के, मच्छिंद्र म्हस्के, प्रविण म्हस्के, दत्तात्रय म्हस्के गुरुजी, दशरथ म्हस्के, सर्जेराव भापसे, चंद्रभान म्हस्के, रावसाहेब म्हस्के, कान्हु म्हस्के सरसह अनेकांनी परिश्रम घेतले.
0 Comments