करंजी घाट परिसर बनला सुसाईड पॉइंट ! घाटात पुन्हा अनोळखी इसमाचा लटकलेला मृतदेह !

 

करंजी - नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातुन दगडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह दाट झाडीत एका झाडाला लटकलेला आढळुन आला. करंजी घाटाची आत्महत्या किंवा प्रेताची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण म्हणुन जणु ओळख होत असुन, हि मालिका थांबता थांबेना त्यामुळे एरव्ही निसर्गरम्य असलेला परिसर दहशतिच्या सावटाखाली आहे.  

नगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातुन दगडवाडीकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर वन विभागाच्या हद्दीत दाट झाडी आहे. या झाडीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळुन आला. मागील महिन्यातच करंजी घाटात एक संपुर्ण जळालेला मृतदेह आढळला होता. त्याच्या शरिराचे काही मोजकी हाडेच तेवढी शिल्लक होती. या घटनेला महिना होत नाही तोच ही दुसरी घटना आढळुन आल्याने परिसरातील नागरिकात व प्रवासात भितीचे वातावरण पसरले असुन करंजी घाटाची आत्महत्या किंवा प्रेताची विल्हेवाट लावण्याचे ठिकाण म्हणुन ओळख होवु पहात आहे.  

“करंजी घाटाच्या सुरवातीला महामार्ग विभाग पोलीस चौकी जवळ तसेच घाट संपल्या नंतर गव्हाणे बाबा मंदिराजवळ तसेच घाट माथ्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाचा तपशील मिळू शकतो व भविष्यात होणारया गुन्ह्याची उकल होवू शकते”   

पाथर्डी पोलिसांनी या अनोळखी इसमाच्या प्रेताचा पंचनामा केला असुन सदर इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास त्वरित पाथर्डी पोलिस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पाथर्डी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हे.काॅ. अरविंद चव्हाण, हरिभाऊ दळवी, सतिष खोमणे आदि करीत आहेत.

 

Post a Comment

0 Comments