करंजी – आम्ही तीन वर्षात काय काम केले हे विरोधकांना दिसले नाही,मात्र
मतदार संघातील लोकांना दिसले आहे, पाथर्डी
मार्केट कमिटी ही राहुरीच्या मार्केट कमिटीसारखी करायची असेल तर मतदारांनी पाथर्डी
मार्केट कमिटीची सत्ता आघाडीच्या ताब्यात द्यावी असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी
केले.
पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे पाथर्डी मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची व कार्यकर्त्याची बैठक आयोजित केली होती या बैठकीत आमदार तनपुरे बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ॲड. प्रताप ढाकणे होते. यावेळी आमदार तनपुरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले मि तीन वर्षात मतदार संघात काय काम केले हे विरोधकांना कसे दिसेल ? पण मतदार संघातील लोकांना काय काम केले याची माहिती आहे. वांबोरी चारीची दहा वर्ष ज्यांनी फक्त बटन दाबायचे काम केले, पाणी मात्र आले नाही, दहा वर्षात जेवढे पाणी वांबोरी चारीला आले नाही तेवढे पाणी दोन वर्षात आल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांना आहे.पाथर्डी मार्केट कमिटीच्या मागील निवडणुकीच्या अगोदर १२ लाख रुपये तोट्यात असणारी ही संस्था ॲड. ढाकणे यांनी पाच वर्षात अनेक कामे करुन ५२ लाख रु. नफ्यात आणली, विरोधकांच्या ताब्यातील एकही संस्था नफ्यात नाही, राहुरी मार्केट कमिटीची सत्ता २० वर्षापासुन आमच्या ताब्यात आहे या संस्थेच्या आज ५० कोटीच्या ठेवी आहेत. पाथर्डी मार्केट कमिटीची सत्ता पुन्हा ॲड. ढाकणे यांच्या ताब्यात दिल्यास राहुरीपेक्षाही अधिक प्रगती या संस्थेची करुन दाखवु असेही आमदार तनपुरे यांनी शेवटी सांगितले. अध्यक्षीय भाषणात ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी पाच वर्षात तोट्यातील संस्था नफ्यात आणल्याचे सांगुन या निवडणुकीतही शेतकऱ्यांच्या व संस्थेच्या हितासाठी सभासदांनी ही सत्ता आघाडीच्या ताब्यात द्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे
रफिक शेख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष
शिवशंकर राजळे, राहुल गवळी, बंडु बोरुडे, अमोल
वाघ, अंबादास डमाळे, विजय पालवे, पंढरीनाथ
चोथे, हिम्मत पडोळे, जालिंदर वामन, सुखदेव
गिते, देवेंद्र गिते, पोपट आव्हाडसह अनेक मान्यवर, सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने ग्रा.पं. सदस्य, सोसा. सदस्य तसेच ग्रामस्थ हजर होते.
0 Comments