पाथर्डी
- शहरासह तालुक्यात महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने शहरात
विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वंचित बहुजन
आघाडी व आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. आंबेडकर भवनात झालेल्या मानवंदना
कार्यक्रमात आमदार मोनिकाताई राजळे, ॲड. प्रतापराव ढाकणे, प्रा.किसन चव्हाण
यांच्यासह तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी महामानवाला
पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यामध्ये भाजप, कॉग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, आम आदमी पार्टी, रिपब्लिकन पक्षाचे
नेते पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
आमदार मोनिकाताई
राजळे यांनी डॉ.आंबेडकर स्मारकात महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत
अभिवादन केले व आपल्या भावना व्यक्त करत उपस्थित आंबेडकर अनुयायी व भीम सैनिकांना
शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी उपनगराध्यक्ष
नंदकुमार शेळके, माजी नगरसेवक रामनाथ बंग, महेश बोरुडे, दिगंबर गाडे, भगवान साठे, जमीर आतार, महेश काटे, रविंद्र आरोळे, वसंत बोर्डे, बाबा राजगुरु, पप्पु बोर्डे आदी
उपस्थित होते. दुपारी राष्ट्रवादीचे नेते ॲड. प्रताप ढाकणे यांनी पुतळ्यास
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व यानिमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना
उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर
राजळे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, सिताराम बापू बोरुडे, सविता भापकर, रत्नमाला उदमले, चांद मणियार, योगेश रासने, देवा पवार, अक्रम आतार आदी
उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष रविंद्र उर्फ भोरु
म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शहरातून वाजत गाजत डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेची
शोभायात्रा काढण्यात आली व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण म्हणाले की, भारतरत्न महामानव
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी
मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता.
बाबासाहेबांच्या शैक्षणिक चळवळीचा हाच खरा मूलाधार होता.
शिक्षणासाठी, समाजाच्या
कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र
देणारे तसेच सर्व क्षेत्रात आपल्या ज्ञानाने असामान्य कर्तृत्व गाजवणारे डॉ.
आंबेडकरांनी वंचित दलित समाजाच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी संदेश दिला. दलित
समाजाला शिक्षणाचे जे दान दिले, हेच पुढे क्रांतिकारी ठरले. पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक
संतोष मुटकुळे तर पाथर्डी नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी
तर श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सचिव सतीश गुगळे यांनी पुष्पहार
अर्पण करून आदरांजली वाहिली. अमोल गर्जे, मुकुंद गर्जे मित्र मंडळाच्या वतीने
आंबेडकर जयंती निमित्त मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments