निर्मळ राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची आ. निलेश लंके यांच्याकडून पाहणी !

करंजी - करंजी हे पाथर्डी तालुक्याचे प्रवेशव्दार आहे, येथे आल्यावर मला पारनेरमध्येच आल्यासारखे वाटते असे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी करंजी येथील नविन पुलाच्या कामाची पहाणी केली त्यावेळी बोलताना व्यक्त केले.  

नगर- पाथर्डी महामार्गावरील देवराई ते कौडगावपर्यंतचे रस्त्याचे काम तिन-चार वर्ष रखडले होते. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेकडो प्रवाशांचा बळी गेला होता. वर्षाला ठेकेदार बदलत होते. आमदार निलेश लंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ॲड हरिहर गर्जे,किसन आव्हाड,हरिदास जाधव यांनी या महामार्गाचे काम त्वरित सुरू करावे म्हणुन चार दिवस उपोषण करताच या महामार्गाच्या कामाला गती आली. निम्म्याहुन अधिक या महामार्गाचे काम पुर्ण झाले आहे. या महामार्गाच्या कामाची पहाणी करण्यासाठी आ. लंके आले होते त्यावेळी ते म्हणाले, माझे पारनेर एवढेच मित्र पाथर्डी तालुक्यात आहेत. मि करंजीत आलो की मला पारनेरमध्ये आल्यासारखेच वाटते. या भागातील तळागाळातील आणि सगळ्याच पक्षातील माणसाशी माझे जवळचे संबंध आले आहेत. मोहटादेवी हे श्रध्दास्थान आहे. मोहटादेवी आणि मित्रांच्या भेटीला मि कायम येत असतो, पारनेरइतकाच जवळचा मला पाथर्डी तालुका वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रफिक शेख, सुरेशनाना साखरे, महादेव अकोलकर, मुरडेमामा, गजानन गायकवाड, भानुदास अकोलकर, भाऊ अकोलकर, रावसाहेब दानवे, लालासाहेब खोसे, जालिंदर वामन सह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.यावेळी ग्रामस्थांनी गावात जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न आमदार लंके यांच्याकडे मांडुन या रस्त्याचे काम चांगल्या पध्दतीने करुन देण्याच्या सुचना ठेकेदाराला द्याव्यात अशी विनंती करताच त्यांनी आपण या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलण्याचे आश्वासन दिले.

 

Post a Comment

0 Comments