लग्नाचे किस्से आपण अनेक ऐकले असतील मात्र चक्क दोन भाष्यानी आपल्या मामाच्या मुलीशी लग्न करण्याच्या कारणा वरून तुंबळ हाणामारी केल्याची घटना ऐकीव नसेल.नगर मध्ये चक्क मामाच्या मुलीशी लग्न करण्यावरून दोघा सख्या भावांत वाद होऊन एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली अन् हा वाद थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल झाला आहे.
यातील एका भावाचे आधी लग्न झालेले आहे.मामाच्या मुलीसोबत मला लग्न करावयाचे आहे. तू तिला फितवू नको. लग्न झालेल्या भावाने मात्र छोटयाचे ऐकले नाही मलाच मामाच्या मुलीशी दुसरे लग्न करावयाचे आहे, असे सांगितले. नगर शहरातील लालटाकी परिसरात यातून दोघांमध्ये वाद वाढला रोडवरील एका वस्तीत ही घटना घडली. यातील एका भावाचे दुसन्या भावाच्या डोक्यात बाटलीच फोडली.याप्रकरणी जखमी भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी या प्रकारा बाबत चर्चेला उधाण आले आहे.
0 Comments