शहरात सुमारे पाचशे
गायी, गोर्हे, वळू आदी गोवंश बेवारस फिरून प्लास्टिक कचरा, चहाचे कागदी ग्लास, टाकाऊ भाजीपाला, हॉटेल खानावळीचे
वेस्टेज खाद्य खात फिरतात अन्नपदार्थ चिकटलेल्या कॅरीबॅगा तर लहान वासरे सुद्धा
खातात पालिकेचे या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधत नागरिकांनी प्रशासनाला कळवून
काहीच कार्यवाही होत नसल्याने शहरातील गोप्रेमींनी व गोरक्षण समितीने मृत गाईंची
विल्हेवाट वर्गणी गोळा करून लावण्यासाठी पुढाकार घेतला. काही पत्रकारांनी
पशुवैद्यकीय अधिकारी तथा प्रभारी गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे, पालकमंत्री
राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयाचे याकडे लक्ष वेधले. बुधवारी दुपारी शहरातील
गोप्रेमी तरुणांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्राणांतिक वेदनेने तळमळणाऱ्या
गाय व वासरांना एकत्रित करून गटविकास अधिकाऱ्यांना कळविले. मीटिंगमध्ये असून निरोप
देतो असे सांगूनही वेळेवर मदत मिळाली नाही. पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास
अधिकारी मिळत नाही. पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचारी नाहीत. पालिका व पंचायत समिती
परस्परांच्या संपर्कात नाही.
या संतप्त आंदोलन
करणाऱ्या युवकांपुढे उत्तर देताना मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिलगिरी व्यक्त
करत संबंधित कर्मचाऱ्यांची चूक मान्य करून यापुढे असे प्रकार होणार नाही
कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेवु तसेच तश्या सक्त सूचना
आरोग्य विभागास दिल्या. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून जनावरांची
तपासणी करू व उपाययोजना राबवु असे पत्र आंदोलकांना दिले.यावेळी गोरक्षण समितीचे
सोमनाथ बंग, मुकुंद गर्जे,
शिवसेनेचे नंदकुमार डाळिंबकर, आशुतोष शर्मा, सारंग मंत्री, नानासाहेब पालवे, महेश बाहेती, निलेश इजारे, आदिनाथ लगड, अमोल केरकळ, प्रशांत हम्पे, सनी दिनकर, तेजस पटवा आदिंसह
कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments