जिंदगी फाऊंडेशनचे कार्यालय समाजसेवेचे "हब" म्हणून नावारूपास येईल- सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री


करंजी ( २२ एप्रिल ) पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील जिंदगी फाऊंडेशन च्या माध्यमातून राज्यभरात समाजसेवेचे कार्य वेगात होऊन जिंदगी फाऊंडेशनचे कार्यालय समाजसेवेचे हब म्हणून नावारूपास येईल असे प्रतिपादन ह. भ. प. सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री यांनी जिंदगी फाऊंडेशन कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी गेले.

पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी फाटा येथे जिंदगी फाऊंडेशन त्रिभुवनवाडीचे अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर ह. भ. प. सुदर्शन महाराज कारखेले शास्त्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिंदगी फाऊंडेशन त्रिभुवनवाडी चे संस्थापक अध्यक्ष विजय कारखेले, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे, भगवद्गीता प्रवक्ते भाऊसाहेब शेलार, प्रा. सचिन बर्डे, आदर्श शिक्षक विठ्ठल कारखेले, मेजर नितीन पालवे, आदिनाथ कारखेले, रावसाहेब कारखेले, चंद्रकांत कारखेले, मनोज कारखेले, योगेश कारखेले, रविकिरण कारखेले, साहिल पालवे, शिवाजी कारखेले, रमेश क्षेत्रे, शांताबाई कारखेले, अलका जायभाये, ठकुबाई कारखेले, साक्षी घुले, मनीषा कारखेले यांच्यासह परिसरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जिंदगी फाऊंडेशनच्या कार्यालयाचे काम लवकरच पूर्णत्वास आणून या कार्यालयाच्या माध्यमातून समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून अहमदनगर जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यात समाजसेवेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिंदगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय कारखेले यांनी याप्रसंगी दिली.

जिंदगी फाऊंडेशन त्रिभुवनवाडी चे कार्यालय म्हणजे परिसरातील नागरिकांसाठी समाजसेवेचे हक्काचे व्यासपीठ बनेल असा विश्वास सरपंच व श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे यांनी यावेळी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिंदगी फाऊंडेशन त्रिभुवनवाडी चे अध्यक्ष विजय कारखेले, सूत्रसंचालन उद्योजक भाऊसाहेब शेलार व आभार प्रदर्शन शांताबाई कारखेले यांनी केले.

Post a Comment

0 Comments