पाथर्डी तालुक्यातील मुन्नाभाईचे प्रवेश रोखण्याची मागणी !

पाथर्डी  तालुक्यातील ठराविक शिक्षण संस्था मधून १० वी १२ वी पासिंगसाठी राज्यभरातील मुन्नाभाई विद्यार्थ्यासाठी दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होत असते मात्र यामुळे स्थानिक अभ्यासू विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून तालुक्याचे शिक्षण क्षेत्रात बदनामी होत असल्याने स्थानिकांच्या शासकीय नौकरीतील संधि कमी होवू पहात असल्याने मुन्नाभाई प्रवेश रोखण्या बाबत कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे व शुभम येळाई यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिले आहे. 

लाखो रुपये द्या अन विनासायास १० वी १२ वी पास होण्यासाठी पाथर्डीत अॅडमीशन घ्या आणि घरीच रहा सरळ परीक्षेला या आणि उत्तीर्ण व्हा अशी हमी देणारे दलाल व शैक्षणिक संस्था पाथर्डी मध्ये कार्यरत आहेत.या बाबत मगील शैक्षणिक वर्षाच्या परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर दलाल व फक्त परीक्षेसाठी प्रवेश देयाऱ्या संस्था चालकांचा मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ पहावयास मिळाला या बाबत अक्षरशः पोलीस ठाण्या पर्यंत तक्रारी आल्या विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानपरिषदेत या बाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

या सर्व गोष्टीमुळे स्थानिक व नियमित पणे वर्षभर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. व तालुक्याची बदनामी होत आहे परीक्षेच्या दरम्यान सुपरव्हिजन साठी पात्र नसलेले शिक्षक सुपरव्हिजन साठी नेमले जातात फक्त परीक्षेसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरविणे याच उद्देशांनी त्यांची सुपरव्हिजन नेमली जाते. १०० वीद्यार्थ्यामागे एक शिक्षक सुपरव्हिजन साठी नेमले जातात त्यामुळे परीक्षेच्या वेळी खुप मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होतो परिणामी स्थानिक व नियमित पणे वर्षभर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते काही शिक्षण संस्थांना इमारत व प्रयोग शाळा नाहीत जितके अॅडमीशन होतात तेवढी बसण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांची नसते तरीही त्या शैक्षणिक संस्था जास्तीत जास्त अॅडमीशन होण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात दलाल नेमतात त्या दलाला मार्फत प्रवेश मिळून कोट्यावधींचा अपव्यवहार सर्रास करतांना तालुक्याला दिसत आहेत. तरीही त्याशैक्षणिक संस्थावर त्या दलालांवर कोठेही कारवाई होताना दिसत नाही. या मध्ये कोण कोणकोणते अधिकारी सहभागी आहेत याची चौकशी होऊन या बाबत आपण काय काय उपाय योजना करणार आहात याची लेखी उत्तर येत्या १५ दिवसात द्यावे अन्यथा या बाबत कसलीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे व शुभम येळाई यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments