करंजी - अनेक भानगडी करुन आलेल्या सरकारचा कोर्टात काय निकाल लागायचा तो लागेल, पण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या
कोर्टात मात्र यांचा कायमचा निकाल लागेल असे मत राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघाचे
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील भोसे येथे भोसे ते कौडगाव या रस्त्याच्या भुमिपुजन
कार्यक्रमप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. पंढरीनाथ टेमकर होते. आपल्या प्रमुख भाषणात
बोलताना आमदार तनपुरे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. या भागातील वांबोरी
चारीबाबत बोलताना त्यांनी मि आमदार झाल्यापासून सलग दोन वर्ष वांबोरी चारीला पाणी
सोडुन या भागातील तलाव भरुन दिले, दुर्देवाने आपले आघाडीचे सरकार गेले, आणि वांबोरी चारीचे वीज बील थकल्यामुळे अधिकारी पाणी सोडत नव्हते, मि स्वतः पदरचे दिड लाख रुपये शेतकऱ्यांच्या
नावावर भरले,
आणि पाणी
सोडण्याची तयारी केली. हे कळताच भाजपच्या कार्यकर्त्यानी या योजनेची कळ दाबली, पण परत पाणी कुठे आले की नाही? याची साधी चौकशी देखील केली नाही, आमच्या नावाने खोट्या अफवा पसरुन लोकांची
दिशाभुल केली. दहा वर्षात त्यांच्या काळात जेवढे पाणी या योजनेला आले नाही तेवढे
पाणी दोन वर्षात आम्ही सोडले, १५५ कोटी रुपयांची मिरी-तिसगाव पाणी योजना मंजुर केली. आज शेतकरी अवघड
परिस्थितीतुन जात असताना या सरकारने अतिवृष्टीचे अनुदान अद्याप शेतकऱ्यांना दिलेले
नाही मात्र गतिमान सरकारच्या जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च या सरकारने केला, या सरकारचा कोर्टात काय निकाल लागायचा तो
लागेल पण पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मात्र शेतकरी व महागाईने बेजार
सर्वसामान्य जनता यांचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे, अमोल वाघ, सेनेचे राजेंद्र म्हस्के, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जालिंदर वामन, आडगावचे सरपंच जगन्नाथ लोंढे, भोस्याचे सरपंच विलास टेमकर, उपसरपंच साळवे,
सतिष क्षेत्रे, सुखदेव गिते,पिनु मुळे,
ॲड.टेमकर, ग्रामसेविका आशा काळेसह अनेक मान्यवर व
मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते. प्रास्ताविक अशोक टेमकर यांनी केले तर आभार
विलास टेमकर यांनी मानले.यावेळी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याबद्ल आमदार
तनपुरेंचा महिलांनी सत्कार केला.
0 Comments