पाथर्डी - शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या स्नेहबंध तसेच विश्वेश्वर ग्रुपच्या वतीने सामाजिक दृष्टीकोन ठेवत उपजिल्हा रुग्णालयातील नवजात बालके तसेच प्रसूती झालेल्या मातासाठी संरक्षक कपड्यांच्या किटचे सामाजिक उपक्रमा अंतर्गत वितरण करण्यात आले.
हजारो रुपये खर्चून साजरे केले जाणारे वाढदिवस,पार्ट्या तसेच इतर
कार्यक्रमातून अनाठाई खर्च करून होणारी अन्नाची नासाडी तसेच भेटवस्तू,पुष्पगुच्छ
आदी खर्चा ला फाटा देवून आपण समाजाचे देणे लागतो या सामाजिक भावनेतून समाजातील
वंचित तसेच उपेक्षित घटकांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी शहरातील स्नेहबंध व
विश्वेश्वर ग्रुपच्या वतीने यापुढील कालावधीत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूत
होणाऱ्या गरीब कुटुंबातील महिला व बालकांसाठी संरक्षणात्मक कपडे,बेबी
किट,मच्छरदाणी आदी उपयोगी वस्तूंचे वितरण करण्याच्या उपक्रमाला सुरवात करण्यात आली
असून यापुढील कालावधीत हा उपक्रम दैनदिन राबवला जाणार असल्याची माहिती ग्रुपच्या
वतीने देण्यात आली.
यावेळी डॉ सुहास उरणकर, संदीप बाहेती, अॅड.हरिहर
गर्जे, सागर बाहेती, श्रीकांत काळोख,
डॉ जगदीश मुने,आय्युब सय्यद, अशोक डोमकावळे, धीरज गुंदेचा, सुरेश
बोरुडे, गणेश मुने, मयूर चिंतामणी,
संतोष साप्ते, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.विशाल
वाघ तसेच परिचारिका सारिका विधाते आदी उपस्थित होते.
0 Comments