पाथर्डी तालुक्यातील जवखेडेत औरंगजेबाच्या पोस्टर वरून तणाव

 


पाथर्डी- जवखेडे गावातील चार युवकांनी त्यांचे मोबाईलचे व्हॉटसअप स्टेटसवर, "औरंगजेब आलमगीर सरकार" असे नाव असलेला औरंगजेबाचा फोटो स्टेटस वर ठेवला असल्याने गावामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला असून याबाबत माहीती पोलिसांना मिळाल्या वरून पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी जवखेडे येथे भेट देवुन गावात शांतता राखण्याचे आवहान केले आहे.

गुरुवारी 08/06/2023 रोजी 12 वा.पोलीस स्टेशनला हजर असताना, आम्हास गोपनीय माहीती मिळाली की, इसम नामे मोसीन अजमोद्दीन शेख, असीफ अजमोद्दीन शेख, शाहीद नईमोद्दीन पठाण व एक अलपवयीन मुलागा असे चौघेजण सर्व रा. जवखेडे खालसा ता. पाथर्डी यांनी त्यांचे

मोबाईलचे व्हॉटसअप स्टेटसवर, "औरंगजेब आलमगीर सरकार" असे नाव असलेला औरंगजेबाचा फोटो स्टेटस वर ठेवला होता अशी गोपनीय माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी वरील इसमांनी त्यांचे मोबाईलवर ठेवलेले स्टेटसची खात्री करण्यासाठी पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलिस प्रल्हाद पालवे ,मुरली लिपणे यांनी सदर ठिकाणी जावून खात्री केली असता चारही इसमांचे मोबाईलवर वरील वर्णनाचे स्टेटस ठेवले असल्याचे त्यांनी पोलीस निरीक्षक यांना फोनवरुन कळविले. सदर कारणावरुन जवखेडे खालसा गावामध्ये दोन समाजामध्ये शत्रुत्वाची, व्देषाची भावना निर्माण होवुन, दुर्भावना वाढण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याने पोलसांनी तात्काळ जवखेडे खालसा ता. पाथर्डी येथे संबधीत इसमांचे मोबाईल ताब्यात घेतले असून जवखेडे खालसा ता. पाथर्डी येथील दोन्ही समाजाचे प्रतिष्ठीत नागरीकांची भेट घेवुन, त्यांनाशांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

आरोपी मोसीन अजमोद्दीन शेख, असीफ अजमोद्दीन शेख, शाहीद नईमोद्दीन पठाण, व एक अलपवयीन मुलगा असे चौघांनी सर्व रा. जवखेडे खालसा ता. पाथर्डी यांनी, त्यांचे कृत्याने जवखेडे खालसा गावामध्ये दोन समाजामध्ये शत्रुत्वाची, व्देषाची भावना निर्माण होवुन, दुर्भावना निर्माण होईल याची जाणीव असताना, "औरंगजेब आलमगीर सरकार " असे नाव असलेला औरंगजेबाचा फोटो त्यांचे मोबाईल व्हॉटअपवर स्टेटसवर ठेवुन, प्रसिद्ध व प्रस्तुत केला आहे. म्हणुन पोलिसांनी चार युवक यांचेविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे.

Post a Comment

0 Comments