कडा / वार्ताहर-आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करुन त्या अहमदनगरसह इतरत्र विक्री करणारी टोळी तालुक्यात सक्रिय होती. अंभोरा पोलिसांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास या टोळीचा पर्दाफाश करत तीन जणांना गजाआड करुन मुसक्या आवळल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील बीएसएनएल टॉवरच्या ६५ हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा दि.१७ मे रोजी अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अंभोरा दिली. पोलिस आरोपींच्या शोधात होते. तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील तीन जणांनी ही चोरी केल्याची माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच त्यांनी सोपान वाघुले, सुखदेव खिळदकर, विनोद खिळदकर यांना पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरट्यांनी गुन्हा केल्याची केल्याची कबुली दिली आहे.याबाबत सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवी देशमाने, आदिनाथ भडके, उद्धव गडकर, शिवदास केदार, अमोल शिरसाठ, रवींद्र राऊत, सतीश पैठणे यांनी केली. अंभोरा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वस्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
0 Comments