राजेंद्र जैन / कडा - हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी व मुस्लिम धर्मियांची बकरी ईद हे दोन्ही पवित्र सण एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करीत सपोनि विजय देशमुख यांच्या उपस्थितीत आषाढीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथे सहायक पोलीस निरिक्षक विजय देशमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करीत आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे हिंदू बांधवांसह पोलिस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले आहे.
या शांतता समितीच्या बैठकीस कृषी बाजार
समितीचे सभापती रमजान तांबोळी, सरपंचपूत्र युवराज
पाटील, काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविंद्र ढोबळे, ग्राप सदस्य आरिफ शेख, काकासाहेब कर्डीले, अनिल ढोबळे, ठकाराम दुधावडे, दीपक गरूड, पत्रकार बांधव यांच्यासह पोउनि किशोर
काळे, पोलिस हवालदार बाबासाहेब गर्जे, पो काॅ सद्दाम शेख, सचिन गायकवाड, दीपक भोजे, मझर सय्यद व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
आषाढी एकादशी व बकरी ईद हे पवित्र सण एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे
हिंदूंच्या भावनांचा आदर करीत यादिवशी कुर्बानी न देण्याचा आम्ही मुस्लिम
बांधवांनी निर्णय घेतला आहे असे मौलाना हारुन व रमजान तांबोळी, कडा यांनी सांगितले तसेच आषाढी एकादशी व बकरी ईद हे हिंदू-
मुस्लिम बांधवांचे पवित्र सण एकाच दिवशी येत असल्याने हिंदू- मुस्लिम बांधवांनी
एकमेकांना शुभेच्छा देऊन हा सण शांततेत साजरा करुन कडेकरांनी सामाजिक एकतेची
परंपरा कायम ठेवावी असे सपोनि विजय देशमुख यांनी सांगितले.
0 Comments