राजेंद्र जैन / कडा - ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढल्यामुळे बालविवाह प्रथेला ब्रेक
लागावा, म्हणून लिंबोडी ग्रामपंचायतने पुढाकार
घेतला असून, सरपंच श्रीमती गयाबाई आंधळे यांच्या
अध्यक्षतेखाली ग्रा.प. सदस्यांची विशेष बैठक बोलावून बालविवाह रोखण्यासाठी ठराव
मांडला व बहुमताने मंजूर करुन गावांतर्गत बाल सरंक्षण समिती स्थापन केली आहे.
गावात बालविवाह होऊ नयेत. म्हणून असा ठराव घेणारी आष्टी तालुक्यात लिंबोडी
ग्रामपंचायत पहिली ठरली असून, या ठरावाचे
सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
आष्टी तालुक्यात ग्रामीण भागात सध्या बालविवाह लावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे
या प्रथेला कुठेतरी आळा बसावा, हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून गावात किंवा परिसरात बालविवाह होऊ नयेत.
म्हणून बेटी बचाव, बेटी पडाव, या उपकक्रमांतर्गत लिंबोडी येथील
ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून, लिंबोडी गावच्या सरपंच श्रीमती गयाबाई आंधळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.प.
सदस्यांची कार्यालयात विशेष बैठक घेऊन बालविवाह रोखण्यासाठी ठराव मांडला व तो ठराव
बहुमताने मंजूर करुन गावांतर्गत बाल सरंक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे.
जिल्हाधिका-यांच्या आवाहानाला प्रतिसाद...
ग्रामीण भागात होणारे बालविवाह रोखण्यासाठी गावच्या सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी करताच, आष्टी तालुक्यातील लिंबोडी या छोट्याशा ग्रामपंचायतीने
बालविवाहाला आळा बसावा, म्हणून ग्रा.प. सदस्यांच्या बैठकीत ठराव
मांडून त्यास बहुमताने मंजूर करुन जिल्हाधिका-यांच्या आवाहानास प्रतिसाद देऊन
तालुक्यात सर्वप्रथम स्तुत्य निर्णय घेतला आहे.
0 Comments