महिला बचत गटाची उत्पादने ऑनलाईन विक्री व्हावीत – येरेकर

पाथर्डी - महीला बचत गटांनी केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता चांगली असते,अँमेझाँन व फ्लीपकार्ड वर महीलांनी तयार केलेले उत्पादने विकली पाहीजेत,त्यासाठी जिल्हा परीषद पुढाकार घेत आहे,नारीशक्तीचा आर्थिक स्तर उंचावण्याचा हा उमेद अभियानाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.अहमदनगर जिल्ह्यातील बचत गटांचे कार्य राज्याला दिशादर्शक ठरावे असे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे मुख्यकार्य़कारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले. 

कासारपिंपळगाव येथे धनलक्ष्मी महीला ग्रामसंघाच्या वतीने बचत गटांच्या महीलांनी तयार केलेल्या मालाचे विक्रीकेंद्राचा शुभारंभ आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परीषदेचे सदस्य राहुलादाद राजळे, सरपंच मोनालीताई राजळे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.जगदिश पालवे,उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सोमनाथ जगताप, अनिल सानप, अनिल भवार, सुनिताताई भगत हनुमानटाकळीच्या सरपंच मिना शिरसाट, उषा तुपे, आशा म्ह्स्के, जमुना पगारे,योगिता भगत, वनीता क्षिरसागर, विजया आमटे, मंगल कासार, पुनम पवार, शितल राजळे, सविता भगत, कविता पवार, आप्पासाहेब राजळे, उमेश तिजोरे, अंकुश राजळे, काबंळे गुरुजी,उमेदचे तालुका व्यवस्थापक आण्णासाहेब मोरे, सचिन हाडुळे,राजेश केडाळे, प्रकाश शिरसाट, आकाश रामटेके, प्रविण दहीफळे,धनंजय आंधळे उपस्थीत होते. यावेळी बोलताना येरेकर म्हणाले, नगर जिल्ह्यात बचत गटांचे काम चांगले सुरु आहे. उमेदचे सोमनाथ जगताप व त्यांचे सहकारी अतिशय उत्तम रितीने महीलांच्या सबलीकरणासाठी व रोजगार निर्मीतीसाठी कार्य करीत आहेत. बचत गटांची चळवळ ही व्यापक बनली पाहीजे. महीलांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ तयार करुन देण्याचे काम सुरु आहे. महीलांना बाजार पेठेचे कौशल्य शिकविण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. सरपंच मोनाली राजळे यांनी अतिशय चांगले काम केले आहे.महीलांनी त्यांनी प्रेरणा दिली. सुविधा दिल्या आणि येथील महीलांनी जिल्ह्यातील पहीले काँपशाँप सुरु केले आहे. महीलांचे स्थान जो पर्यंत बळकट होत नाही तो पर्यंत समाज पुढे जावु शकत नाही. रवि देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. प्रमोद म्हस्के यांनी आभार मानले.

महीलांच्या उन्नतीसाठी जिल्हा परीषद व उमेद अभियान चांगले काम करीत आहे कासारपिंपळगाव येथील बचत गटाचे काम चांगले आहे. महीला घराबाहेर पडुन उद्योग करीत आहेत. रोजगार निमीती होवुन महीलांचे आर्थिक प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही महीला सोबत अहोत. विकासाच्या प्रक्रियेत महीलांचा सहभाग वाढला आहे. महीला आत्मनिर्भर होत आहेत. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मदतीने येथील महीलांच्या कामासाठी कायम तत्पर राहु असे कासारपिंपळगावच्या सरपंच मोनाली राजळे यांनी सांगितले

महीलांनी सुरु केलेल्या काँपशाँपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कौतुक केले,महीलांच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांनी उत्पादीत केलेले मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी केलेला हा पहीला प्रयोग यशस्वी होईल. आम्ही महीलांच्या सोबत अहोत असे येरेकर यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments