एसपी साहेब, सरकारी वाहनाअभावी तेवीस गावांची पाटीलकी करायची कशी?

 

राजेंद्र जैन / कडा - तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी महत्वाची बाजारपेठ असलेल्या कडा पोलिस चौकींतर्गत जवळपास ४० हजार लोकसंख्या, कड्यासह लहान- मोठ्या तेवीस गावांचा विस्तार व तीस ते पस्तीस किमी अंतराची हद्द आहे. मात्र या बहुचर्चित पोलिस चौकीला लाल दिव्याचे साधे सरकारी वाहन नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या गावांची वाहनाअभावी पाटीलकी करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे पोलिस कर्मचा-यांसाठी अक्षरश: आव्हान बनले आहे. 

आष्टी तालुक्यातील मध्यवर्ती असलेली कडा शहराची बाजारपेठ व्यापारी दृष्टीकोणातून सर्वाधिक मोठी आहे. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महाविद्यालय, विविध बँका, पतसंस्था, हाॅस्पीटल याठिकाणी आहेत. विशेष म्हणजे दैणंदीन कामासाठी परिसरातील पंचवीस, तीस गावांचा नियमित संपर्क येत आहे. या पोलिस चौकींतर्गत कडयासह लहान -मोठया अशा बावीस गावांचा विस्तार असून, गावांतर्गत जवळपास ४० हजार लोकसंख्या आहे. तर तीस ते पस्तीस किमी अंतराची हद्द आहे. मात्र या बहुचर्चित पोलिस चौकीला लाल दिवा असलेले सरकारी वाहन देखील नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या तेवीस गावांवर वाहनाअभावी नियंत्रण मिळवणे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे. पोलिस कर्मचा-यांसाठी आव्हान बनले आहे. तर दूसरीकडे गावागावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंद्यांनी डोके वर काढल्याने सामाजिक स्वास्थ दुषीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस अधिक्षक साहेंबांनी कडा पोलिस चौकीला पेट्रोलिंग करण्यासाठी कायमस्वरुपी सुस्थितीत असलेले सरकारी वाहन देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे

·         तालुक्यात कड्याची बाजारपेठ सर्वाधिक मोठी असून, या पोलिस चौकींतर्गत तेवीस गावे, जवळपास ४० हजार लोकसंख्या, आणि २५ ते ३० कि.मी. अंतराची हद्द आहे. मात्र वाहनाअभावी या गावांवर नियंत्रण ठेवणे पोलिस कर्मचा-यांसाठी आव्हान बनले असून, सामाजिक वातावरण दूषित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस अधिक्षक साहेंबांनी येथील पोलिस चौकीला पेट्रोलिंगसाठी सरकारी वाहन उपलब्ध करुन द्यावे असे रविंद्र ढोबळे, काँग्रेस अध्यक्ष आष्टी यांनी सांगितले.

 

Post a Comment

0 Comments