कडा - येथील अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या मोतीलाल
कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला । जय जयघोष
करीत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बाल वारकऱ्यांचा दिंडीचा नेत्रदीपक रिंगण
सोहळा पार पडला.
मोतीलाल विद्यालयात विठू माऊलीच्या पालखीचे पूजन आणि विठ्ठलाची आरती करून पालखीला प्रारंभ झाला. शाळेतील प्रांगणात रिंगण सोहळा झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ वाजवत, हलगीचा आवाज करत मनमुराद आनंद लुटला. या दिंडी सोहळ्यासाठी चिमुकल्यांनी वारकऱ्यांचा वेषभूषा परिधान करून भगव्या पताका खांद्यावर घेत दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत विठ्ठल- रखुमाई ची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर कडा गावातून. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी काढण्यात आली.
या दिंडीमध्ये चंदनमल भळगट प्राथमिक शाळेचे चिमुकले सहभागी झाले होते. दिंडीच्या अग्रस्थानी पालखी तयार करण्यात आली होती.चौकाचौकात लेझीम पथकाने पाऊल खेळत, फुगडीचा मनमुराद आनंद लुटला. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी कडेकरांनी रस्त्याच्या दुतर्फा चौकाचौकात गर्दी केली होती.
0 Comments