कडा (राजेंद्र जैन) - एकमेकांवर प्रेम
जडले,
प्रेमाच्या
आणाभाका घेत एकमेकांच्या प्रेमात एकांत बुडालेल्या दोघांनी प्रेमविवाह करून संसार
थाटण्यास सुरुवात केली. लग्न होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटत नाही तोच, प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील ठोंबळसांगवी येथे घडली असुन अंभोरा
पोलिस ठाण्यात सासु,पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या
प्रकरणी २० जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पायल आदेश चौधरी (वय- २०) असे आत्महत्या केलेल्या नव विवाहितेचे नाव असून आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. याच प्रेमाचे रूपातंर तीन महिन्यापुर्वी लग्नात झाले.
-----------------
तीन महिन्यातच
झाला प्रेमविवाहाचा दुर्देवी शेवट !
सासु,पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास
घेऊन आत्महत्या
आष्टी तालुक्यातील ठोंबळसांगवी येथील घटना
-----------------
एकमेकांवर जीवापाड प्रेम असलेली जोडीने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. मात्र
काही दिवसातच घरातील वातावरण खराब होऊ लागले. सासु, पती वारंवार त्रास देऊ लागल्यामुळे प्रेमाला दृष्ट लागली अन् याच त्रासातून
पती नगरला तर सासु शेळ्या चारण्यासाठी गेल्याची संधी साधत तिने नको आयुष्य म्हणत
घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ रोजी सहाच्या दरम्यान घडली. मयत
महिलेचा मामा दत्तात्रय लेकुरवाळे रा. कुसडगांव ता.जामखेड. जि.अहमदनगर यांच्या
फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात आरोपी पती आदेश चौधरी, सासु अलका चौधरी यांच्यावर आत्महत्येस
प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके
करीत आहेत.
0 Comments