दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार कोडिंग शिक्षण

नगर - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक विज्ञानाची माहिती व्हावी यासाठी 'कोड ऑन व्हील्स' हा प्रकल्पाची सुरुवात जिल्हा परिषद अहमदनगर आणि कोड टू इनहान्स लर्निंग ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात दुर्गम भागात विध्यार्थ्यांना लॅपटॉप, स्मार्ट टिव्ही आणि थ्रीडी प्रिंटर असणारी फिरती मोबाईल व्हॅन जाऊन विद्यार्थ्यांना, मोफतपणे 'ब्लॉक कोडिंग आणि थ्रीडी प्रिंटिंग' या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार २१ व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करता येईल, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी या उद्घाटन प्रसंगी केले.

बाबुर्डी घुमट येथील विद्यार्थी हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जवळून थ्रीडी प्रिंटर कसे कार्य करतो हे समजून घेतले.जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी जयश्री कारले, नगर तालुका गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, विस्तार अधिकारी मनीषा कुलट यांसह इतर अधिकारी वर्ग आणि शिक्षक तसेच कोड टू इनहान्स लर्निग ट्रस्ट तर्फे संस्थापक इरफान ललानी, प्रकल्प व्यवस्थापक राहुल बांगर, अनुप यादवप्रीतम लोणारे, अंकिता तंडेल आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments