शेवगावात दरोडा,दोघे व्यापारी ठार

 

शेवगाव - येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन गंगा किशन बलदवा यांच्या बाजारपेठेतील घरी पहाटे पडलेल्या दरोड्यात गोपी किशन बलदवा आणि पुष्पा हरिकीसन बलदवा यांचा मृत्यु झाला आहे.

गोपी किशन गंगा किशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भाऊजाई पुष्पा हरिकिशन बलवा वय ६५ या दोघांचा या या दरोडे मध्ये मृत्यू झाला असून सुनिता गोपीकिशन बलदवा ह्या घटनेमध्ये गंभीर जखमी झाल्या आहेत.www.adhirajya.com 

दरोड्यात बलदवा कुटुंबियांच्या डोक्यामध्ये लोखंडी सळई सहाय्याने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनास्थळावर अहमदनगर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, परीक्षेतील आयपीएस अधिकारी बी रेड्डी, व शेवगाव ची पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.घटनास्थळावर व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments