शेवगाव -
येथील भुसार व्यापारी बलदवा यांच्या राहत्या घरी दरोडा मारून दोघांची हत्या केल्या
प्रकरणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथून एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
गोपीकिशन गंगाकिशन बलदवा व त्यांच्या मोठ्या भाऊजाई
पुष्पा हरिकिशन बलदवा या
दोघांचा या दरोडे मध्ये मृत्यू झालेला असून सुनिता गोपीकिशन बलदवा ह्या घटनेमध्ये
गंभीर जखमी झाल्या होत्या .www.adhirajya.com.पोलिसांनी पकडलेला
आरोपी रात्रीच्या वेळी छोटा हत्ती टेम्पो मध्ये येवून नगर जिल्ह्यात गुन्हे करत
असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृस्तीकोनातून पोलिसांचा तपास सुरु आहे. पकडण्यात आलेला
आरोपीचे वर्णन घटना ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजशी मिळते जुळते असल्याची माहिती
समजते आहे.
0 Comments