पाथर्डी - माळी बाभूळगाव शिवारातील विहरीत चार जनांच्या मृत्यु प्रकरणी मयत कांचन सांगडे हीच्या
वडीलांनी पोलिसात धम्मपाल आमंदराव सांगडे याच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
मयत कांचन हीला धम्मपाल नेहमी त्रास देत
होता,त्यांच्या त्रासाला
कंटाळल्याने कांचन व तिच्या मुलांचा मृत्यु झाला असल्याचे तक्रारीत
म्हटले आहे. पोलिसांनी धम्मपाल सांगडे याला अटक केली आहे. माळीबाभुळगाव
हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह
आढळले होते. पोल्ट्रीफार्मवर कामासाठी आलेल्या कुंटुबातील एक महीला , तिचा एक मुलगा व दोन
मुली अशी तिन मुले यांचे चौघांचे मृतदेह विहरीत सापडले.चौंघाचे
मृतदेहाचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे.
पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली होती. मयत काचंनचे वडील दिंगबर
म्हसाजी काळबांडे रा. बाभळी,पो.गोरलेगाव,ता. हातगाव, जि.नांदेड यांनी शुक्रवारी पाथर्डी पोलिसात
हजर होवुन तक्रार दाखल केली आहे. धम्मपाल सांगडे हा कांचनला लग्न
झाल्पासुनच त्रास देत होता. त्याला दारुचे व्यसन आहे. बुधवारी
रात्री देखील कांचनला धम्मपालने मारहान व शिवीगाळ केली होती.
त्यांचे भांडण तेथे काम करणा-या इतर मजुरांनी सोडविले होते.
त्यानंतर रात्री पुन्हा धम्मपालने भांडन केले होते. त्यानंतर ही घटना रात्री
घडली होती. पोलिस उपनरिक्षक सचिन लिमकर यांनी मुलीचे वडील यांचा जबाब
नोंदविला आहे. कांचन सांगडे,मुलगा निखील सागडे, मुलगी निषीधा व संचिता
सांगडे यांचे प्रेते विहरीत सापडल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. पोलिस पुढील तपास
करीत आहेत.
0 Comments