पाथर्डी – येवू घातलेल्या आषाढी एकादशी तसेच बकरी ईद आदी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा आणि सु व्यवस्था आबाधित रहावी यासाठी पोलिस,महसूल,पालिका प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाण्यात राजकीय,सामाजिक,व्यावसाईक नागरिकांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली.
यावेळी प्रशासनाकडून बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या भावना समजून घेत येणाऱ्या काळात सामाजिक सलोखा राखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर विचारविनिमय करण्यात आला.यावेळी आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे,प्रांतधिकारी प्रसाद मते, तहसीलदार शाम वाडकर,पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मुख्याधिकारी संतोष लांडगे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,बंडू बोरुडे,यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुकुंद गर्जे,अरविंद सोनटक्के,एलियास शेख,हुमायून आतार,भगवान बांगर,अजय भंडारी,संतोष जिरेसाळ आदींनी यावेळी भावना व्यक्त करताना म्हटले की,सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाणीव पूर्वक द्वेष पसरवला जातो व सलोखा बिघडतो त्यामुळे तालुक्यात सायबर सेलची स्थापना करावी,शांतता कमिटीमध्ये सुसंकृत माणसाचा समावेश करण्यात यावा.चोरीच्या घटना रोखाव्या,किरकोळ कारणावरून मोर्चे काढण्यपेक्षा सर्व धार्मिक समाजाचे प्रतिनिधीचा समावेश करत पंचकमिटी स्थापन करावी.मोबाईलच्या माध्यमातून समाजामध्ये धार्मिक कट्टरता निर्माण करणाऱ्याना समाजातील धर्माधं व्यक्तीचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करावी.नगररोडवरील शाळेच्या ठिकाणी स्पेडब्रेकर बसवावे,छेडछाड रोखण्यासाठी तसेच चोऱ्या रोखण्यासाठी संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी एक कर्मचारी नेमण्यात यावा. अशी मागणी यावेळी बैठकीत करण्यात येवून यापुढील कालावधीत धार्मिक सलोखा राखून सण उत्सव साजरा करण्यात येतील असा निर्धार यावेळी करण्यात आला.
0 Comments