कडा
- तालुक्यातील
पांगरा येथे धुमाकूळ घालणारा एक बिबट्या विहिरीत पडला , पकडण्यासाठी पिंजरा लाऊन ही तो वन विभागाच्या
तावडीतून निसटला आहे.
आष्टी तालुक्यातील पांगरा येथील चांदणी शिवारत दराडे वस्तीवरील शेतकऱ्यांच्या
तीन शेळ्यांचा बिबट्याने फडशा फाडला. त्यानंतर रामनाथ मिसाळ या शेतकऱ्यांच्या
विहिरीत काल रात्रभर तो अडकला होता. आज शुक्रवार दि.३० जुन रोजी सकाळी वनविभागाचे
कर्मचारी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आले. मात्र हा बिबट्या त्याला पिंजऱ्यात
अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या तावडीतून निसटला आणि त्याने
जंगलाकडे धूम ठोकली. तो मोकाट असल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले
आहे.
मागील आठ महिन्यापासून हा बिबट्या याच परिसरातील अधिवासात राहत असून, अद्याप कोणत्याही व्यक्तीवर बिबट्याने हल्ला
केलेला नाही. ज्या विहिरीत तो पडला होता, ती विहिर कमी उंचीची होती आणि बाहेर पडल्यावर तो त्याच्या अधिवासात पुन्हा
गेल्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे वनाधिकारी श्याम शिरसाट यांनी
सांगितले.
0 Comments