पाथर्डी - आषाढी एकादशी निमित्त भगवानगड
येथे जमलेल्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेवून भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी
तसेच मौल्यवान चीजवस्तूंवर हात साफ करणाऱ्या तीन महिलां आरोपींना जागरूक भाविकांनीच
पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.
काल भगवानगडावर आषाढी एकादशीनिमित्त भाविकांचा उच्चांक झाला होता,भगवान गडावर एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याने दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचा गैर फायदा घेऊन काही चोरट्यांनी भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या,मंगळसूत्र व इतर चीज वस्तूंवर हात साफ करण्यास सुरुवात केली ही बाब जागरूक भाविकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काळ तात्काळ संबंधित महिला चोरांना हेरून पकडले यावेळी एकच गोंधळ उडाला व भाविकांनी सदरील चोरट्यांना लाथा बुक्क्यांचा प्रसाद दिला.
मात्र
बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दागिने चोरीचा आरोप
असलेल्या आरोपी १) अश्विनी रोहिदास झाकणे २) पायल सोनू धोत्रे ३) अनिता अर्जुन
शिंदे राहणार शहागड ता.अंबड जिल्हा जालना या आरोपींना घटना ठिकाणावरून अटक करून पाथर्डी
येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,न्यायाधीश मयुरसिंह गौतम यांच्या समोर उभे केले
असता न्यायालयाने तीनही महिला आरोपींना पुढील तपासासाठी ३ दिवसाच्या पोलिस कोठडीत
ठेवण्याचे आदेश दिले आहेत पुढील तपास पोलीस नाईक भाऊसाहेब खेडकर हे करत आहेत. धार्मिक
ठिकाणी भाविकांच्या चीजवस्तू चोरणाऱ्या आरोपी महिलांविषयी भाविकातून संतापाची
भावना व्यक्त केली जात आहे.
0 Comments