पाथर्डी - " बदलले स्वरूप आले तंत्रज्ञानाचे युग.....चला पाहूया, कसे घडत आहे हे कलयुग..."सध्याच्या बदलत्या युगाचा परिणाम प्रत्येक घटकावर होत आहे. मग तो सजीव असो वा निर्जीव. संपूर्ण जग हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर बदलत चालले आहे. आजच्या युगाला तंत्रज्ञान बोटावर खेळवत आहे. या बाबतीत शैक्षणिक क्षेत्र काही मागे राहिलेले नाही. यामध्ये अनेक बदल आपल्याला पाहायला मिळतात. अगदी अंगणवाडी, बालवाडी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत. पूर्वी गुरुकुल पद्धती होती, त्यानंतर आश्रम पद्धती आली, मुले शाळेत जायला लागली की, त्यांचं शिक्षकांसोबत एक नवीन व अतूट नातं निर्माण होत असे. पाटी आणि पेन्सिल सोबत असायची. काही काळानंतर पाटीपेन्सिल ऐवजी वहीपेन वापरात आला.www.adhirajya.com
आज जर आपण
पाहिले तर, शिक्षण क्षेत्रात
अतोनात प्रगती झाली आहे.डिजिटल एज्युकेशन आले आहे.वहीपेनची जागा टॅब ने घेतली आहे.
विद्यार्थीचा हात हातात धरून "अ,आ इ " शिकवणारा शिक्षक
आता फळ्यासमोर उभा राहून शिकवतो विद्यार्थ्यांनी शिक्षक यांच्यामध्ये अंतर निर्माण
झाले. आणि हे अंतर अजून ही वाढतच जात आहे.शिक्षक आणि विद्यार्थी समोर समोर असताना शिकवल्या
जाणाऱ्या शिक्षणाला ऑफलाईन शिक्षण नाव दिले. पण दोन-तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोविड
महामारीच्या काळात ऑफलाइन शिक्षणाची जागा केंव्हा ऑनलाईन शिक्षणाने घेतली हे समजले
ही नाही.आणि या ऑनलाईन लेक्चर ने विद्यार्थी एवढी प्रभावीत झाली की, तासन् तास शिकवणारे शिक्षक, स्वतःला विसरून
त्यांच्यात रमणारे शिक्षक, वर्षांनू वर्ष शिकवणारे शिक्षक,
त्यांना अनोळखी वाटू लागले, शाळेत,कॉलेजला जाऊन शिकण्याऐवजी घरी बसून,बेड वर लोळून,ना कोणता नियम, ना कोणती शिस्त, ना शिक्षकांचे शिस्तीचे धडे ,वाटेल तेव्हा ब्रेक,
हवे तेवढे ऑफ लेक्चर, ना वेळच बंधन, ना गृहपाठ लिहीण्याचा धाक ही आरामदायी, वातानुकूलित
शिक्षण पद्धत चांगली वाटू लागली. मुले मोबाईल, कॉम्प्युटर,
टॅब, इंटरनेट मध्ये गुंतली गेली.
गुरू-शिष्यची
प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा ऑफलाईन शिक्षणामुळेच कायम राहील म्हणून
ऑनलाईन पेक्षा ऑफलाईनच बेस्ट आहे. एकंदरीत काय तर ? गुरुशिष्य हे प्राचीन काळापासून चालत आलेल्या नात्याला ऑनलाइन शिक्षण
नावाची वाळवी लागली त्यामुळे हे नात वाळलेल्या झाडाप्रमाणे सुकत चाललं आहे. या
नात्याला पुन्हा नवीन पालवी फुटण्याची, नवीन बहर येण्याची
गरज आहे, यामुळे गुरूशिष्यातील वाढता दुरावा कमी होईल,
बदलत चाललेल्या आपल्या गुरुशिष्य परंपरेला आळा बसेल.तसेच इतर
देशाच्या पद्धतीने नाही तर आपल्या प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय शिक्षण
पद्धत अखंड आबाधित राहील. म्हणून औपचारिक ऑफलाईन शिक्षणच पद्धतीचं योग्य आहे. -
लेखिका - दुर्गा भगत (HSC,D.Ed,M.A.B.Ed
(history and Economics)
0 Comments