रसिकलाल धारीवाल फार्मसी महाविद्यालयाची नेत्रदीपक कामगिरी


कडा - येथील श्री.अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या रसिकलाल एम. धारीवाल औषध निर्माण शास्त्र महाविदयालयाने घवघववीत संपादन केले, व्दितीय वर्षाचा 95% निकाल लागला असून, महाविद्यालयाने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

कडा येथील शतकपूर्तीकडे यशस्वीपणे वाटचाल करीत असलेल्या श्री. अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या रसिकलाल एम. धारीवाल या औषध निर्माण शास्त्र महाविदयालयाने व्दितीय वर्षात घवघववीत संपादन केले. कु.काजल शिवाजी सोनवणे (८४.६४ ℅), प्रथम, रोहिणी बाळू काळे (८३℅), व्दितीय, पल्लवी बाळू नरवडे (८२.५५℅) तृतीय क्रमाक मिळवून यांनी घवघवीत यश संपादित केले असल्याची माहिती प्राचार्य महेश म्हस्के यांनी दिली. 

या औषध निर्माण महाविदयालयाने सलग सतराव्या वर्षीही यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली.या महाविद्यालयाचे हजारो विद्यार्थी औषध निर्माण क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर काम करत आहेत. सिपला, जॉन्सन अँड जॉन्सन ,सेंडोज कॅडिला, मायक्रो लॅब, टीसीसीएस फार्माकोविज्युलन्स या ठिकाणी संशोधक म्हणून कार्यरत आहेत. 

अमोलक जैन संस्थेचे पदाधिका-यांनी कौतुक केले. तर शोभाचंद ललवाणी, प्रा. सुजाता गरुड, प्रा. रियाज शेख , प्रा. स्वामी गीते, प्रा. वंदना कोल्हे,आनंद पोखरणा अनारसे मुरटेकर, घोडके ,साबळे ,मदिना शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



 

Post a Comment

0 Comments