काय रे पावसा,कुठे अडलास होतास, यायला एवढा उशीर का केलास ? आभाळ कडे तहानलेले डोळे करून पाहणाऱ्या बळी राजाची थोडी का होईना पण तहान
भागली. ग्रीष्म ऋतू ने निरोप घेतला पण वर्षा ऋतू चे आगमन काही होइना म्हणून
प्रत्येक जण आभाळाकडे डोळे लावून बसले. अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा....
होणारी लाही लाही ..... जमिनीतून निघणाऱ्या उष्णलाटा यांना आता थोडा आराम मिळाला.
धरणीची नांगरणी करून बळीराजा आतुरतेने तुझी वाट पाहत होता. ढग भरून आले अन्
पावसाचा थेंब जमिनीवर पडला आणि मातीच्या सुगंधाने आसमंत दरवळून निघाला...
किती क्षमता त्या थेंबात तहानलेले डोळे शांत झाले, अंगाची होणारी लाही लाही थांबली, नांगरणी करून पेरणी करण्यासाठी तुझी आतुरतेने वाट पाहणाऱ्या
बळी राजाचा मार्ग मोकळा झाला.. पण का रे पावसा.. तू यायला उशीर का करतोस ? तू वेळवर का बरसत नाही ? का तू सगळ्यांना तुझी वाट पाहायला लावतोस....? जाऊ दे दरवर्षी असच करतोस तू आम्हा सगळ्यांना तुझी वाट खूप पाहायला लावतोस. तर
कधी अचानक आलेल्या पाहुण्याप्रमाणे येतोस, मग तेव्हा वेळ ही पाहत नाही आणि काळ ही पाहत नाही.... सर्वांचं किती तरी
नुकसान करून जातोस, जेव्हा तुझी खरंच गरज असते सगळे तुझी वाट
पाहात असतात तेव्हा मात्र तू एखाद्या नववधु सारखा लाजतोस खूप जास्त भाव खातोस आणि
वेळेवर येत नाही सर्वांचा हिरमुड करतोस ....... हे काय रे तुझं असं....
आता मात्र मध्ये कुठे थांबू नकोस ... आलाच आहे तर सगळ्यांना आनंद देऊनच निरोप घे.... जेणे करून पुढच्या वर्षी आम्ही तुझी अशीच आतुरतेने वाट पाहत असू.....(दुर्गा भगत) माजी नगरसेविका नगरपरिषद पाथर्डी
0 Comments