मिरी (प्रति)-आषाढी एकादशीच्या
दिवशीच बकरी ईद असल्याने गावात कोणत्याही प्रकारची कुर्बानी द्यायची नाही, पशु हत्या करायची नाही असा एकमुखी निर्णय येथील मुस्लिम
समाजाने घेवुन राष्ट्रीय एकात्मतेचा व सर्वधर्मसमभावाचे दर्शनच घडवुन या गावात ४०
वर्षापासुन चालु असलेली परंपरा कायम
ठेवली.
पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागात मिरी हे गाव मोठे व बाजारपेठेचे गाव म्हणुन
ओळखले जाते. येथे सर्व धर्माचे लोक अनेक वर्षापासुन एकत्र रहातात, या गावात मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने आहे.
दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद सण आहे. गेल्या ४०
वर्षापासुन या गावात बकरीच्या सणाला मुस्लिम समाज कुर्बानी देत नाही, कोणत्याही पशुची हत्या या सणाला देत नाहीत, ही ४० वर्षाची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय येथील समाजाने
आज घेतला. यावेळी झालेल्या बैठकीत हाजी शेखसर, जाकीर पटेल, खलील पटेल, राजु इनामदार, अन्सारी दारुवाले, सादिक इनामदार, अपसर मेजर, इरफान इनामदार, सादिक मेजर, जलील पटेल, मुसाभाई शेख, जलील शेख,अन्सार कुरेशी, आयुष सय्यद, महंमद सय्यद, कदिर सय्यद, जाकीर सय्यद, मौलाना फतेहगढ रहेमान तसेच मिरीच्या सरपंच सौ. सुनंदा गवळी उपसरपंच संजय शिंदे, अदिनाथ सोलाट, विजय गुंड, संभाजी झाडे, एकनाथ झाडे, बंडु झाडे, अशोक घोंगडे, विष्णु सोलाट, चेअरमन शिवाजी गवळी, आसाराम वीरसह गावातील अनेक मान्यवर व
ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.
मिरी गावात अनेक जाती-धर्माचे लोक आहेत, येथे मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात आहे, एकादशीच्या दिवशी बकरी ईद येत असुनही त्या दिवशी कुर्बानी द्यायची नसल्याचा
मुस्लिम समाजाचा निर्णय कौतुकास्पद असुन मिरीत ही परंपरा ४० वर्षापासुन चालु आहे
असे मिरीच्या सरपंच सुनंदाताई गवळी यांनी सांगितले.
0 Comments