हवामान अंदाज खोटा ठरावा म्हणुन त्रास देण्यात येत असल्याची पंजाबराव डक यांची खंत !

 

करंजी (प्रति)- आजपासुन दिवसाआड या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असुन ४ जुलैपर्यंत नगर जिल्ह्यातील पेरण्या होतील असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसमोर बोलताना येथे व्यक्त केला. 

मराठवाड्यातील भोकर येथुन मोटारीने ते पुण्याकडे जात असताना करंजी बसस्थानकावर त्यांची या परिसरातील शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा तुमच्या अंदाजावर आज शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असुन त्या अंदाजावरच या भागातील शेतकरी आपल्या शेतीचे नियोजन करतात असेही सांगितले. यावेळी पंजाबराव डक पुढे म्हणाले, कालपासुन कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असुन आज दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढेल, ४ जुलैपर्यंत नगर जिल्ह्यातील बहुतेक भागात जोरदार पाऊस होवुन जिल्ह्यातील सर्व भागात पेरण्या पुर्ण होतील. जुलै महिन्यातही मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. मि शेतकर्‍याच्या हितासाठी हे काम करीत आहे, त्याबदल्यात मि एखाद्या कंपनीकडुन शेतकऱ्यांकडुन आजपर्यंत पैसे घेतले नाहीत, परंतु या क्षेत्रातील काही लहान-मोठे हवामान तज्ञ मला त्रास देवुन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझे ३ कोटी फालोव्हर्स असुन मि प्रत्येकी एक रुपया घेतला तरी ३ कोटी महिन्याला कमावु शकलो असतो  पण तसे मि अद्याप केले नसतानाही या क्षेत्रातील काही मंडळी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी गावातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी आदर्श शिक्षक  विजय अकोलकर, गणेश अकोलकर, बंडु मोरे, निलेश मोरे, संजय अकोलकर, तमीज शेख, भाऊसाहेब अकोलकर, विक्रम अकोलकरसह अनेक शेतकरी,मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने हजर होते. माझा हवामानाचा अंदाज खोटा ठरावा म्हणुन काही हवामान तज्ञ माझ्या हवामानाच्या अंदाजात बदल करुन शेतकऱ्यांची दिशाभुल करुन हा चुकीचा मेसेज शेतकऱ्यांपर्यंत पोहचुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, यापासून शेतकऱ्यांनी सावध रहावे असे पंजाबराव डक यांनी सांगितले.

 


Post a Comment

0 Comments