सुसंवाद हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र !

पाथर्डी (दुर्गा भगत) - मानवाला आपले विचार व्यक्त करण्यासाठी भाषा आवश्यक असते.भाषेच्या माध्यमातून मानव आपले विचार व्यक्त करतो. भाषेच्या माध्यमातून मानवाची जडणघडण होते चांगल्या-वाईट विचारांची देवाण-घेवाण होते असते, यासाठी संवाद, सुसंवाद होणे अत्यंत महत्त्वाचे असते. संवाद हा मानवी जीवनात प्राणवायूचे काम करतो; पण सध्याच्या काळात संवादाची जागा सोशल मीडियाने घेतली. माणसांमध्ये भावनिक,सामाजिक दुरावा निर्माण होत चालला आहे.माणसाच्या भेटीगाठी कमी झाल्या, एकमेकांशी संवाद साधणे अत्यंत कमी झाले आहे.जो-तो सध्या सोशल मीडियाचा वापर करून उदाहरणार्थ फोन कॉल, टेक्स्ट मेसेज, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर यांच्या माध्यमातून संवाद साधत आहे. 

नात कुठले ही असो, पण त्या नात्यात गोड संवादाची गरज भासते. एखादं नात जपण्यासाठी आपल्याला विश्वासाची गरज आणि हा विश्वास जुळवून घेण्याचं काम संवादामुळे होत असतो. संवादामुळे नात्याला बहर येतो, नात्यामधला फुलोरा म्हणजे संवाद ! कुटुंबामध्ये होणारा संवाद कमी होत चालला आहे. संवाद न झाल्यामुळे अनेक समज,गैरसमज निर्माण होतात.जो तो आपल्या मतानुसार, विचारानुसार अर्थ लावतो. गैरसमजातून अनेक नको असलेले प्रकार घडतात. म्हणून संवाद अत्यंत महत्त्वाचे ठरते. संवादातून अनेक अडचणी सोडवल्या जातात, त्यावर मार्ग शोधला जातो. व किचकट वाटणाऱ्या गोष्टी सहज व सोप्या होतात. समस्या कशीही असो, कितीही किचकट असो, कुठली ही असो सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे तो म्हणजे सुसंवाद !

संवादाला मुकणाऱ्या घरामध्ये मुले इंटरनेट, टीव्ही, सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत, एकलकोंडी होत आहेत, निर्माण होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इंटरनेटवर शोधतात. घरात माणसे असून देखील मुले फॉलोवर्सला महत्त्व देतात, घरातील माणसांसोबत गोष्टी शेअर करण्याऐवजी ते सोशल मीडियावर शेअर करतात, फॅमिली ग्रुपवर व्हॉटसअप मेसेजेस करतात. म्हणून मुलांसोबत घरांमध्ये संवादाची गरज आहे. तसेच आपण काम करत असलेल्या ठिकाणी सुध्दा संवाद नसेल तर कामात अडथळा निर्माण होतो. या होणाऱ्या अडचणींवर एकमेकांमध्ये चर्चा करण्याऐवजी मोबाईल कॉल व्हिडिओ कॉल टेक्स्ट मेसेज व्हाट्सअप मेसेजेस यांचा वापर केला जातो.जो-तो आपआपल्या परीने उत्तर शोधण्याचे प्रयत्न करत असतो व त्याचा परिणाम म्हणून आज माणसा-माणसातील संवाद हरवत चालला आहे हे सर्वांनी वेळीच जाणून घेतले पाहिजे तरच सुसंवाद हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र ठरेल ! - लेखिका दुर्गा भगत {Hsc.D.ed, M.A.(His & Eco) B.ed ,DSM}

 

Post a Comment

0 Comments