राजेंद्र जैन / कडा - आष्टीसह कड्यात शाळा, महाविद्यालय परिसरात टगेगिरी, शालेय मुलींची छेडछाड, बसस्थानकात बसमध्ये चढउतार करताना प्रवाशांचा खिसा कापणे, महिलांची पर्स चोरी करणे यासारख्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून अंमलदारांचे खास पथक तयार करण्यात आले असून, हे पथक खिसेकापू चोरांसह रस्त्यावरील मोकाट मजनूंची टगेगिरी लवकरच संपुष्टात आणणार असल्याचे पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले.
आष्टी पोलिस ठाण्याला तत्कालिन पोलिस निरिक्षक
दिनेश आहेर यांच्या प्रशासकीय बदलीनंतर अनेक वर्षानी संतोष खेतमाळस यांच्यासारखा
एक शिस्तप्रिय, खमक्या
पोलिस अधिकारी आष्टीकरांना लाभला आहे. पोनि खेतमाळस यांनी ठाण्याचा पदभार घेताच, अनेक गैरप्रकारावर लक्ष
केेद्रीत केले आहे, आष्टी, कडा शहरात सामाजिक शांतता व
कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी थेट कायद्याचा दंडूका उगारला आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात सडकछाप
मजनूंकडून वाहतुक नियम ढाब्यावर बसून रस्त्यावरील ट्रीपलसीट धुमस्टाईल टगेगिरी, शालेय मुलींची छेडछाड यासह
बसस्थानकात बसमध्ये चढउतार करताना प्रवाशांचा खिसा मारणे, महिलांची पर्स चोरी करणे
यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याकरिता पोनि
खेतमाळस यांनी सहा अंमलदाराचे पथक तयार केले असून, या पथकातील दोन पोलिस कर्मचारी दरदिवशी दैणंदिन
परिस्थितीवर लक्ष ठेऊन टगेगिरीला लवकरच पोलीसी खाक्या दाखवणार आहेत. हे पोलीस पथक
सडकछाप मजनूंची टगेगिरी मोडून काढतानाच, बसस्थानक परिसरात वावरणा-या खिसेकापूंच्या मुसक्या आवळून बंदोबस्त
करणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली आहे.
बसस्थानकात खिसेकापू चोरांवर पाळत ठेवण्यासाठी खास पथक तयार करण्यात
आले असून, या पथकातील
दोन पोलीस दरददिवस सतर्क राहतील. यापुर्वी चोरी करणा-या संशयित महिलांना ताब्यात
घेऊन त्यांच्यावर सीआरपीसी -१०९ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाणे
हद्दीत समन्स, वारंट
बजावणी करुन पंचवीस आरोपींना अटक केली आहे. शालेय मुलींची छेड काढणा-या रोडरोमिओंना
आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालय
परिसरात पेट्रोलिंग नेमण्यात आले आहे असे आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस
यांनी सांगितले.
0 Comments