कडा / वार्ताहर - तामिळनाडू येथील "मनी
ट्रेडींग" या नावाच्या तथाकथित कंपनी मालकाने कडा येथील कांद्याचे व्यापारी
हाफीज तांबोळी यांचा विश्वास संपादन जवळपास सव्वा कोटीचा रुपयांचा कांदा खरेदी
करुनही कांद्याचे पैसे दिले नाहीत. त्यामुळे तांबोळी यांच्या फिर्यादीवरुन
तामिळनाडूच्या त्या व्यापा-या विरोधात आष्टी पोलिसांत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्र बाजार समितीमध्ये
हाफीज नुरमहमंद तांबोळी यांचे अलंकार ट्रेडींग कंपनी या नावाची आडत दुकान असून, शेतक-यांकडून कांदा
विकत घेऊन भारतातील विविध राज्यात ते व्यापा-यांना कांदा पाठवत असतात. सदर कांदा
व्यापार हा फोनवरून विश्वासावर चालत असतो. समोरच्या व्यापा-याला कांदा
पाठवल्यानंतर हा व्यापारी त्याचे कमिशन वजा करुन कांदा मालाची विक्री झालेली रक्कम
आॅनलाईन पद्दतीने जमा करतात. मात्र तामिळनाडू येथील मनी ट्रेडर्स या कंपनीचा मालक
मनी पदवतन्र पेनियार याने कांद्याला चांगला भाव देतो म्हणून पहिल्यांदा गोड बोलून
विश्वास संपादन केला.
ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने कडा येथील हाफीज नुरमहमंद तांबोळी
यांच्या मालकीच्या अलंकार ट्रेडींग कंपनीमार्फत दि. १०/१२/२०१७ ते २४/१२/२०१८ या
कालावधीत अनेकवेळा कांदा खरेदी केला. कोणत्या तारखेस किती कांदा माल अन् कोणत्या
ट्रकव्दारे पाठवला, किती
रकमेचा माल होता. किती रक्कम प्राप्त झाली याबाबतच्या सर्व नोंदी अलंकार
ट्रेडींगच्या खतावणी पुस्तिकेत नमुद आहेत.
तामिळनाडूच्या त्या व्यापा-याकडे अलंकार ट्रेडींगची एक कोटी वीस लाख पासष्ट हजार
त्रेपन्र रुपये एवढी बाकी त्याच्याकडे आहे. या रकमेसंदर्भात यापुर्वी अनेकवेळा
फोनवरुन त्याच्याकडे मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आपण स्वत:
तामिळनाडूला गेलो. पण तेथेही दुस-याच व्यक्तिच्या नावाची ही फर्म असल्याचे आढळून
आले. याप्रकरणी कड्याचे कांदा व्यापारी हाफीज तांबोळी यांनी मनी पदवतन्र पेनियार
या इसमाने माझा विश्वासघात करुन फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांत केली, याप्रकरणी आष्टी
पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस
उपनिरिक्षक अजीत चाटे करीत आहेत. तामिळनाडूच्या या ठकाने नगर जिल्ह्यातही काही
कांदा व्यापा-यांची फसवणूक करुन लाखो रुपयाला गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.
0 Comments