सायबर विभागाकडून माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संतोष मुटूकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे,पो.कॉ.संदीप बडे,पो.कॉ. बटूळे,पो.कॉ.गरगडे यांनी पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथील दत्त जनरल स्टोअर्स येथे छापा घातला असता तेथून बनावट आधारकार्ड वापरून शेकडो सिमकार्ड विशिष्ट लोकांना विक्री करण्यात आल्याचे समोर आल्याने आरोपी भागवत साहेबराव बनसोडे रा.भालगाव ता.पाथर्डी याची अधिक माहिती घेतली असता आरोपीचे प्रत्यक्षात दुकान नसून तो राहत्या घरातून आयडिया व जिओ कंपनीचे सिमकार्ड विक्री करणारा डीलर असल्याचे समोर आले. आरोपीने विक्री केलेल्या सिमकार्डच्या कागदपत्रांचे रजिस्टर, ओळखपत्र याबाबत विचारणा केली असता आरोपी भागवत बनसोडे याने पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांनी त्याचे घराची झडती घेतली असता त्याने विक्री करता आणलेले हजारो सिमकार्ड तसेच स्कॅनिंग साठीचे पॉज मशीन,मोबाईल संच आदी मुद्देमाल आढळून आला असून तो तपासकामी जप्त करण्यात आला आहे.आरोपी भागवत बनसोडे याने बनावट ग्राहकांची छायाचित्र वापरून,बनावट आधारकार्ड तयार करून अनेक सिमकार्ड वितरीत केले असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्या वरून आरोपी बनसोडे याचे विरुद्ध बनावट दस्तावेज बनवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी पुढील तपासासाठी अटक केले आहे.
- अत्यंत सुलभ रीतीने विक्री केले जाणारे मोबाईल सिमकार्ड आरोपीने बनावट आधारकार्ड तयार करून कोणत्या उद्देशाने आणि कुणाला विक्री केले याचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याने तसेच आरोपीने विक्री केलेले सिमकार्ड ठराविक नावाच्या लोकांनाच विक्री केल्याची प्राथमिक माहिती असल्याने या सीमकार्डचा उपयोग करून देशविघातक कृत्ये करण्यासाठी केला का ? पाकिस्तान, बांगलादेश अश्या शत्रू राष्ट्रातून आलेल्या समाजविघातक लोकां कडे स्थानिक ओळखपत्र नसल्याने त्यांच्या साठी बनावट ओळखपत्र तयार करून सीमकार्ड विक्री केले का ? सिमकार्ड विक्री करण्यासाठी आरोपीने स्वतचा आयडी अनेक डीलरला देवून एकाच वेळी अनेक ठिकाणहून असे सिमकार्ड विक्री केले असल्याची प्राथमिक माहिती असल्याने याबाबत तपासी यंत्रणांनी सखोल तपास करणे आवश्यक झाले आहे.
0 Comments