कड्यात दर्जदार कांद्याला सतराशे रुपये प्रतिक्विंटल भाव !

राजेंद्र जैन / कडा - येथील कृषी उत्पन्र बाजार समितीत दर्जेदार गावरान कांद्याला सर्वाधिक सतराशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाळा असून, कांदा उत्पादकांना ब-यापैकी दिलासा मिळाला. रविवारी बाजारात बावीस हजार गोण्यांची आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सुत्रांकडून देण्यात आली.

कडा कृषी उत्पन्र बाजार समितीत प्रत्येक रविवारी कांद्याचे लिलाव असतात. या दिवशी जवळपास बावीस हजार गावरान कांदा गोण्यांची आवक झाली असून, प्रतवारी नुसार एक नंबरच्या दर्जेदार गावरान कांद्याला प्रतिक्विंटल एक हजार सातशे रुपये एवढा भाव मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला चौदाशे ते पंधराशे तर तीन नंबरच्या गोल्टी कांद्याला एक हजार ते बाराशे रुपये इतका भाव मिळाला असल्याची माहिती कडा बाजार समितीचे सचिव हनुमंत गळगटे यांच्याकडून देण्यात आली. गावरान कांद्याला बाजारात ब-यापैकी भाव मिळाल्यामुळे या भागातील कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. 


Post a Comment

0 Comments