अज्ञानाचे हरण करणाराच खरा गुरु- हभप बबन महाराज बहिरवाल

 

राजेंद्र जैन / कडा - आईवडीलानंतर गुरुची सेवा हिच सर्वश्रेष्ठ असून ज्यांच्या हातून शुध्द भावनेने गुरुची सेवा घडली, त्यास वेगळी साधना करण्याची गरज नाही. कारण अज्ञानाचे हरण करणाराच खरा गुरु असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य प.पु. वै. मदन महाराज संस्थानचे मठाधिपती हभप बबन महाराज बहिरवाल यांनी केले.

कडा येथील श्रध्दास्थान प.पु.वै. मदन महाराज बिहाणी यांच्या संतनगरीच्या पवित्र भूमीत गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित किर्तन सोहळ्यात ते बोलत होते.याप्रसंगी बोलताना हभप बबन महाराज म्हणाले की, देव हाच ज्यांचा हेतू आहे, तेच खरे संत आहेत. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुने केलेले उपकार कृतज्ञ करण्याचा हा दिवस असून, आईवडीलानंतर समाजात गुरुचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. आजपर्यंत आपल्या आयुष्यात ज्यांनी गुरु आज्ञेचे पालन केले. त्यांनीच हिमालयाची उंची गाठली आहे. कड्याच्या पवित्र भूमीत गुरुवर्य मदन महाराज यांच्यासारखा परोपकारी महात्मा पुन्हा कधी होणे नाही. त्यांचं सामाजिक व अध्यात्मिक कार्य अविस्मरणीय आहे. कारण त्यांच्या कृपाशिर्वादामुळे तुमच्यासमोर मी उभा आहे. त्यांच्यामुळेच माझी ओळख असल्याचे सांगत असताना बबन महाराजांचे डोळे भरुन आले अन् त्यांनी अश्रुंना वाट करुन दिली.

याप्रसंगी हभप बोडखे महाराज, हभप दादा महाराज चांगुणे, हभप आमटे महाराज, हभप सोमनाथ आपरे, माजी आमदार साहेबराव दरेकर, बाबासाहेब गुंजाळ, भीमराव पाटील, हनुमंत बिहाणी, माजी सरपंच श्रीरंग कर्डीले, अण्णासाहेब चौधरी, सभापती रमजानभाई तांबोळी, माजी सभापती संजय ढोबळे, उपसरपंच बाळासाहेब कर्डीले, प्राचार्य हरिदास विधाते, सरपंचपूत्र युवराज पाटील, सुनील नाथ, हरिभाऊ मार्कंडे,, परमेश्वर कर्डीले, संतोष भंडारी, राजाबापू कर्डीले, गोकूळ कर्डीले, प्रा शाम सांगळे, गोरख कर्डीले, सुभाष सोनवणे, संभाजी कर्डीले, चंद्रकांत ससाणे आदी भाविक भक्तांसह कडा परिसरातील माता-भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments