पाथर्डी - तालुक्यातील माणिकदौंडी घाटाच्या पायथ्याशी केळवंडी
शिवारात गुरुवार दि. ६ एप्रील २०२३ रोजी इथेनॉल टँकर पलटी होऊन लागलेल्या आगीत
जळुन दुःख निधन झालेल्या टँकरचा सहचालक स्व.गणेश रामराव पालवे यांच्या घरी
प्रशासनाच्या वतीने तहसिलदार शाम वाडकर व गटविकास अधिकार डॉ.जगदीश पालवे यांनी आज
सकाळी १० वाजता भेट देऊन कुटुंबियाची विचारपुस करून सांत्वन करत धीर दिला तसेच
प्रशासन स्व.गणेश पालवे यांच्या कुटुंबासोबत असुन शासनाच्या वतीने
शक्य ती सर्व प्रकारची मदत केली जाईल असे अश्वासन तहसिलदार शाम वाडकर यांनी यावेळी
दिले.
यावेळी सरपंच नारायण पालवे, माजी सरपंच संभाजी गर्जे, खरेदी विक्री संघाचे संचालक गंगाधर गर्जे, माजी उपसरपंच उद्धव माने, ग्रामसेवक बाळासाहेब तिडके ,तलाठी अमित टिळेकर, अशोक धायतडक, संदिप कराड आदि उपस्थित होते.टँकरचा सहचालक मयत गणेश पालवे हे आर्थिक दृष्ट्या अत्यंत गरीब कुटुंबातील असुन अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंब मोलमजुरी करून आपली उपजिवीका करत आहेत. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांचे वडील मयत असुन त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, दोन लहान मुले आहेत. त्यांची मुले सध्या शिक्षण घेत आहेत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने शक्य ती सर्व प्रकारची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरपंच नारायण पालवे यांनी तहसिलदार यांचे कडे केली.
यावेळी तहसिलदार शाम
वाडकर म्हणाले की घडलेली घटना अत्यंत दुर्देवी असुन मयत गणेश पालवे यांच्या
कुटुंबाला भेट दिल्यावर आपण व्यथित झालो आहोत. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत
मिळवुन देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून गोपीनाथ मुंडे शेतकरी आपघात
विमा योजना,
संजय गांधी
निराधार योजना प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्याला सुचना
देऊन तातडीने मंजुरी दिली जाईल तसेच इतर शक्य असेल ती सर्व प्रकारची शासकीय मदत
करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू असे सांगितले. यावेळी गणेश यांचे बंधु
संतोष पालवे आई इंदुबाई,
पत्नी मनिषा
पालवे,
मुले महेश व
प्रमोद तसेच चुलते गहीनीनाथ पालवे, शहादेव पालवे यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments