कडा / वार्ताहर- येथील बाजारपेठेच्या प्रमुख मार्गावरील रस्त्यावर मोकाट जनावरांसह वराहांचा मोठ्या प्रमाणात मुक्त संचार वाढल्यामुळे शालेय मुले, जेष्ठ नागरीकांसह वाहनचालकांची डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे या वर्दळीच्या रस्त्यावर नाहक अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
कडा येथील पाथर्डी- धामणगाव मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते नगर-बीड या मुख्य रस्त्यावरील डाॅ. आंबेडकर चौक ते बसस्थानक या वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे आणि वराहांचा वाढलेला मुक्तसंचार नागरीकांसाठी धोकादायक ठरु लागला आहे. याठिकाणी बाजारपेठ असल्याने नेहमीच शाळेत जाणारी मुलांसहीत नागरीकांची सतत मोठी वर्दळ असते. या रहदारीच्या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय आहेत. त्यामुळे शालेय मुले, जेष्ठ नागरिक, महिलांसह वाहनचालकांना रस्ता पार करताना अक्षरश: जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. या जनावरांमुळे यापुर्वी अनेकदा झालेल्या अपघातात अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचाय कार्यालयाने वेळातवेळ काढून मोकाट जनावरांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरीकांसह व्यापा-यांकडून होत आहे.
---------%%-----
0 Comments