राजेंद्र जैन / कडा - एखादं शहर असो की, छोटसं गाव तिथे पोष्ट कार्यालय म्हणजे डाकघर असतेच. आणि डाकघर किंवा पोष्ट ओळखण्याची खुण म्हणजे त्या कार्यालयाच्या दारात असलेली लाल रंगाची पत्रपेटी . मात्र पत्र टाकण्यासाठी पत्रपेटी नसलेलं एकमेव डाकघर आष्टी तालुक्यात मोठ्या बाजारपेठेचे शहर असलेल्या कडा येथे पाहावयास मिळत आहे.
आष्टी तालुक्यात अनेक गावांचा नियमित संपर्क असलेले सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून कडा शहराची ओळख आहे. याठिकाणी कृषी उत्पन्र बाजार समिती, अनेक शाळा, महाविद्यालय, बँका, पतसंस्था, रुग्णालय शासकीय निमशासकीय कार्यालय आहेत. तसेच पोष्ट कार्यालय म्हणजे डाकघर देखील आहे. त्यामुळे एखाद्या गावातील डाकघर म्हटले की, या कार्यालयाच्या दारात नागरीकांना पत्रव्यवहार करण्यासाठी लाल रंगाची पत्रपेटी ही असतेच, मात्र कडा येथील या महत्वाच्या पोष्ट कार्यालयात पत्रपेटी नसल्यामुळे नागरीकांना आपले पत्र किंवा टपाल बाहेरगावी पाठवायचे असेल तर याठिकाणी पत्रपेटीची उणीव भासू लागली आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तिला बाहेरगावी टपाल पाठवायचे असल्यास पत्र नेमके कशात टाकावे. असा प्रश्न कडेकरांना पडला आहे.
-----------------------------------------------
लहाणपणी खुपदा मामाच पत्र हरवलं, ते कुणाला सापडलं... असं बालगीत म्हटलं जात असत. मात्र कड्यात पोष्ट कर्मचा-यांच्या दुर्लक्षामुळे चक्क पत्रपेटीच हरवली आहे. त्यामुळे नागरीकांनी ऐनवेळी पोष्ट कार्ड किंवा टपाल नेमके कशात टाकावे. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
0 Comments